सिद्धिविनायक ते दादर १.१२ किमी लांब भुयारीकरणाचा टप्पा अखेर पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 01:55 AM2020-12-17T01:55:07+5:302020-12-17T01:55:18+5:30
७ जुलै २०२० रोजी या टप्प्याचे काम सुरू करण्यात आले होते. या भुयारीकरणासह पॅकेज-४चे एकूण १०.९६ किमी लांबीचे भुयारीकरण पूर्ण झाले आहे.
मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ या भुयारी मेट्रो-३ अंतर्गत कृष्णा-१ या टनेल बोरिंग मशीनद्वारे सिद्धिविनायक ते दादर हा १.१२ किमी लांब ३५वा भुयारीकरणाचा टप्पा पूर्ण करण्यात आला आहे.
७ जुलै २०२० रोजी या टप्प्याचे काम सुरू करण्यात आले होते. या भुयारीकरणासह पॅकेज-४चे एकूण १०.९६ किमी लांबीचे भुयारीकरण पूर्ण झाले आहे. यासाठी ३ टनेल बोरिंग मशीन कार्यरत होत्या, अशी माहिती मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनद्वारे देण्यात आली.
दुसरीकडे दादर मेट्रो स्थानकाचे जवळपास ४२ टक्के काम पूर्ण झाले आहे. दरम्यान, आता एकूण ७ पैकी ४ पॅकेजेसमध्ये भुयारीकरण १०० टक्के पूर्ण झाले आहे.
भुयारीकरण आव्हानात्मक काम आहे. शहराचे मुख्य केंद्र मानले जाणारे दादर, मेट्रो-३द्वारे जोडले जाईल. मुंबईकरांच्या अडचणी कमी होतील, अशी माहिती मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक रणजित सिंह देओल यांनी दिली.
दादर, सिद्धिविनायक, शीतलादेवी या स्थानकांचा समावेश आहे.
८ भुयारीकरणाचे टप्पे पूर्ण करण्यात आले.
नयानगर ते धारावी (अपलाइन – ५८९ मी. आणि डाउनलाइन – ५८९ मी.)
नयानगर ते दादर (अपलाइन – २४९१ मी. आणि डाउनलाइन - २४७२ मी.)
सिद्धिविनायक ते दादर (अपलाइन - ११०६ मी. आणि डाउनलाइन –
११२६ मी.)
सिद्धिविनायक ते वरळी (अपलाइन - १३०५ मी. आणि डाउनलाइन -
१२८४ मी.)