मुंबई - न्हावा-शेवा बंदरात सीमा शुल्क विभागाने एक लाख १२ हजार किलो सुपारीची तस्करी पकडली आहे. या सुपारीची किंमत पाच कोटी ७९ लाख रुपये आहे. गेल्या आठवड्यात देखील याच बंदरावर सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी १८९ मेट्रिक टन सुपारीची तस्करी पकडली होती. तिची किंमत नऊ कोटी ६३ लाख रुपये होती. यूएई येथून आलेल्या या कंटेनरमध्ये विशिष्ट प्रकारची भुकटी असल्याचे कागदोपत्री दाखवण्यात आले होते. मात्र, तपासणीत मोठ्या प्रमाणावर सुपारी असल्याचे आढळले. या सुपारीवर ११० टक्के शुल्क आकारणी होते. मात्र, ते भरावे लागू नये म्हणून आयातदाराने त्याची खोटी नोंद केली होती. या प्रकरणात सहा कोटी २७ लाख रुपयांचे सीमा शुल्क बुडवण्याचा प्रयत्न झाला आहे.