घोडमाळचा113 वर्षाचा विघ्नहर्ता

By admin | Published: September 2, 2014 11:33 PM2014-09-02T23:33:05+5:302014-09-02T23:33:05+5:30

तालुक्यातील वासुरी बुडुको उर्फ घोडमाळ या गावातील सांबरे कुटुंबांचा गणपती वाडय़ात प्रसिद्ध आहे.

113-year-old bell man | घोडमाळचा113 वर्षाचा विघ्नहर्ता

घोडमाळचा113 वर्षाचा विघ्नहर्ता

Next
अशोक पाटील - कुडूस
तालुक्यातील वासुरी बुडुको उर्फ घोडमाळ या गावातील सांबरे कुटुंबांचा गणपती वाडय़ात प्रसिद्ध आहे. या सांबरे घराण्याच्या गणपतीला 113 वर्षे पूर्ण झाली असून यंदा 114 वे वर्ष आहे. साधेपणा, परंपरा आणि ऐतिहासिक गुंफणीचा वारसा लाभलेला हा विघ्नहर्ता आहे.
19क्1 मध्ये  वालकू पद्म सांबरे यांनी प्रथम घोडमाळ येथे गणोशमूर्तीची प्रतिष्ठापना केली. वाडा आणि कुडूस दोन्ही शहरांपासून घोडमाळ 3क् कि.मी. अंतरावर दुर्गम भागातील हे  गाव आहे. कोहोच किल्याच्या पायथ्याशी असल्याने शिवरायांचे घोडे येथील माळावर असायचे, म्हणून वसुरी बुद्रुकचे घोडमाळ झाले. 19क्1 ते 195क् र्पयत या गावी पायवाट होती. त्यावेळी डोक्यावर गणोशमूर्ती नेली जात होती. सांबरे म्हणाले, त्यावेळी घोडमाळ, गोन्हे गौरापूर  जामघर  आणि वाडा अशा तालुक्यातील पाच गावात पाच गणोशमूर्ती या घराण्याकडे होत्या. 
 
वर्षापूर्वी गावातील आदिवासी समाजातील कारागीर बांबूंच्या लहान पात्यांपासून नक्षीदार डेकोरेशन बनवित असत. तेच डेकोरेशन आजही केले जाते. अवाजवी खर्च, कर्णकर्कश आवाज टाळण्यात येऊन साधेपणाने सांबरे घराण्याचा हा विघ्नहर्ता प्रतिष्ठापित करण्यात येतो. 2क्क्क् सालार्पयत गणोश उत्सवात ढोल नाच, तारपा नाच, टिपरीनाच अशा जून्या तालावर उत्सव साजरा होत असे. अलिकडे नव्या पिढीत या गोष्टींना बगल देऊन भजन व सांस्कृतिक कार्यक्रम केले जातात. या सर्व बाबीत खर्चाची मर्यादा ठेवून साधेपणाही जपला जातो.  भगिनींकडून मन:शांती व इच्छापूर्तीसाठी नारळाची तळी अथवा तोरणो देवापुढे ठेवली जातात.
 
गावाचे गावपण टिकून प्रत्येकाची प्रगती झाली. गावाचा विकास झाला. दु:ख द्रारिद्रय़ दूर झाले. म्हणून आम्ही सांब:यांचा विघ्नहर्ता असे या गणोशाला संबोधतो, असे विलास सांबरे यांनी सांगितले. वालकू सांबरे, बाबू सांबरे  आणि आता तुकाराम सांबरे या विघ्नहत्र्याची सेवा करीत आहेत. या सांबरे कुटुंबाला ही परंपरा कायम ठेवण्यासाठी गावकरीही प्रत्येक उत्सवाला साथ देत आहेत.
 

 

Web Title: 113-year-old bell man

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.