किनारा रस्त्याबाबत ११४ मते

By admin | Published: July 9, 2016 02:09 AM2016-07-09T02:09:46+5:302016-07-09T02:09:46+5:30

सागरी किनारा रस्त्याची निविदा प्रक्रिया ही अधिक स्पर्धात्मक व परिपूर्ण पद्धतीने व्हावी, यासाठी महापालिकेतर्फे याविषयी परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेला संबंधित क्षेत्रातील

114 votes about shore road | किनारा रस्त्याबाबत ११४ मते

किनारा रस्त्याबाबत ११४ मते

Next

मुंबई : सागरी किनारा रस्त्याची निविदा प्रक्रिया ही अधिक स्पर्धात्मक व परिपूर्ण पद्धतीने व्हावी, यासाठी महापालिकेतर्फे याविषयी परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेला संबंधित क्षेत्रातील ३५ वेगवेगळ्या संस्थांचे प्रतिनिधी हजर होते. या प्रतिनिधींनी परिषदेवेळी मांडलेली ११४ मते व त्यावरील महापालिका प्रशासनाची भूमिका, महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
कोस्टल रोडच्या स्टेज-१बाबत महापालिकेद्वारे आयोजित आमंत्रण पूर्व परिषदेला चीन, नेदरलँडस, श्रीलंका व बेल्जियम या देशांतील ३५ प्रतिनिधींनी उपस्थिती दर्शविली होती. या प्रतिनिधींनी कोस्टल रोड स्टेज-१च्या निविदा प्रक्रियेबाबत विविध मते मांडली. यामध्ये बोगदा बांधण्याचा अनुभव विचारात घेताना जलविद्युत प्रकल्पांमध्ये बांधलेल्या बोगद्यांचा अनुभव लक्षात घ्यावा; वेगवेगळ्या स्वरूपाच्या कौशल्याची व तंत्रज्ञानाची आवश्यकता लक्षात घेऊन संयुक्त उपक्रमामध्ये ३ऐवजी ४ संस्थांना भागीदार होण्यास परवानगी असावी; अनुभवाबाबत अशासकीय संस्थांसाठीच्या कामांचा अनुभव ग्राह्य धरावा; बोगद्याबाबत ८ पदरी रस्त्यांच्या ऐवजी ४ पदरी रस्ता असलेल्या बोगद्यांच्या बांधणीचा अनुभव लक्षात घ्यावा; अशा प्रकारच्या मतांचा समावेश आहे. त्यानुसार प्राप्त झालेली ११४ मते व त्याबाबत प्रशासनाची भूमिका या बद्दलचा तपशील महापालिकेच्या संकेतस्थळावर नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: 114 votes about shore road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.