Join us

११४८ संपकरी एसटी कर्मचाऱ्यांच्या नोक-या गेल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 4:52 AM

वेतनवाढीच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या अघोषित संपात सहभागी झाल्याबद्दल राज्यातील एकूण १ हजार १४८ एसटी कामगारांना महामंडळाने सेवामुक्त केले आहे.

मुंबई : वेतनवाढीच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या अघोषित संपात सहभागी झाल्याबद्दल राज्यातील एकूण १ हजार १४८ एसटी कामगारांना महामंडळाने सेवामुक्त केले आहे. दुसरीकडे ही कारवाई त्वरित मागे न घेतल्यास, मान्यताप्राप्त संघटनेने आंदोलन छेडण्याचा इशारा महामंडळाला दिला आहे.८ व ९ जून रोजी राज्यातील एसटी कामगारांनी अघोषित संप पुकरला होता. संपात चालक कम वाहक आणि सहायक अनुकंपा तत्त्वावरील कर्मचारी सहभागी झाल्याने एसटी रस्त्यावर निघू शकल्या नाहीत, असे महामंडळाचे म्हणणे आहे. मुळात प्रशासनाने कोणतीही शहानिशा न करता, तडकाफडकी सेवामुक्तीचे लेखी आदेश कर्मचाºयांना दिले आहेत. ही कारवाई नियमबाह्यअसून, शिस्त व अपील कार्यपद्धतीचा भंग करणारी आहे. त्यामुळे कारवाई त्वरित मागे न घेतल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा महाराष्ट्र मान्यताप्राप्त एसटी कामगार संघटनेचे सरचिटणीस हनुमंत ताटे यांनी महामंडळाला दिला.मुंबईतील परळ आगारातील ३८ एसटी कामगार, कुर्ला आगारातील २२, पनवेल आगारातील १८ कामगारांवर कारवाई करण्यात आली आहे. मुंबई विभागात एकूण १३८ कामगारांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती एसटीतील अधिकाºयांनी दिली.राज्यातील १ हजार १४८ कर्मचाºयांवर कारवाई केली. उर्वरित कर्मचाºयांवरही कारवाई सुरू आहे. महामंडळातील कारभार तुघलकी असून, ही कारवाई सूडभावनेने केलेली आहे. कामगार संघटना महामंडळाच्या पाठीशी सदैव उभी राहणार आहे. ही कारवाई म्हणजे, भविष्यातील आंदोलनाची ठिणगी असल्याची प्रतिक्रिया महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेसचे अध्यक्ष जयप्रकाश छाजेड यांनी दिली.>अधिकाºयांचे मौनराज्यभर सुरू असलेल्या कामगाराच्या कारवाईबाबत महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक रणजीत सिंह देओल आणि कामगार विभागाचे महाव्यवस्थापक माधव काळे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.>आंदोलनाची झळ वारकरी प्रवाशांना‘आषाढी वारी’निमित्त पंढरपूरमध्ये लाखो भाविक येतात. भाविकांच्या परतीच्या प्रवासासाठी महामंडळ दरवर्षी विशेष एसटी चालवते. यंदाही विशेष एसटी चालविण्याचे नियोजन महामंडळाचे आहे. वारी विशेष बैठक २१ जून रोजी मुंबई सेंट्रल येथील मुख्यालयात पार पडेल.तथापि, सध्या सुरू असलेला महामंडळ आणि एसटी कामगार यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र झाल्यास, याचा फटका वारकरी प्रवाशांना बसण्याची शक्यता असल्याचे एसटीतील वरिष्ठ अधिकाºयांनी सांगितले.