आंबेडकर स्मारकासाठी ११६ वृक्ष तोडणार, प्राधिकरणाची मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2018 02:19 AM2018-07-06T02:19:01+5:302018-07-06T02:19:12+5:30

दादर पश्चिम येथील इंदू मिलच्या जागेत उभारण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे बांधकाम होणार आहे. मात्र या बांधकामाच्या मार्गात तब्बल ११६ वृक्ष आहेत. हे वृक्ष तोडण्यास महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीने गुरुवारी हिरवा कंदील दाखविला आहे.

116 trees to be demolished for Ambedkar memorial, approval of authority | आंबेडकर स्मारकासाठी ११६ वृक्ष तोडणार, प्राधिकरणाची मंजुरी

आंबेडकर स्मारकासाठी ११६ वृक्ष तोडणार, प्राधिकरणाची मंजुरी

Next

मुंबई : दादर पश्चिम येथील इंदू मिलच्या जागेत उभारण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे बांधकाम होणार आहे. मात्र या बांधकामाच्या मार्गात तब्बल ११६ वृक्ष आहेत. हे वृक्ष तोडण्यास महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीने गुरुवारी हिरवा कंदील दाखविला आहे.
दादर पश्चिम येथील वीर सावरकर मार्गावर असलेल्या इंदू मिलच्या जागेवर भारतरत्न डॉ. आंबेडकर यांचे भव्य स्मारक उभे राहणार आहे. या स्मारकाच्या बांधकामात अडसर ठरणारी ११६ झाडे काढण्याची परवानगी वृक्ष प्राधिकरणाकडे मागण्यात आली होती. या ११६ झाडांपैकी ७९ झाडे कापली जाणार आहेत तर ३७ झाडांचे पुनर्रोपण केले जाणार आहे. याबाबतचा प्रस्ताव गुरुवारी वृक्षप्राधिकरण समितीपुढे मंजुरीला आला असता सर्व पक्षांच्या सदस्यांनी याला विरोध न करता मंजुरी दिली.
जागा मार्च २०१७मध्ये राज्य सरकारच्या ताब्यात आली. सुमारे ४०० कोटी रुपये खर्च करून एकूण साडेबारा एकर जमिनीवर डॉ. आंबेडकर यांचे भव्य स्मारक उभारले जाणार आहे. ११.४ एकर जमीन स्मारकासाठी राखीव असून ६.४ एकर जागा सीआरझेडच्या बाहेर आहे. तर सहा एकर जागा ही सीआरझेडमध्ये आहे.

Web Title: 116 trees to be demolished for Ambedkar memorial, approval of authority

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई