महापालिकेच्या ११७ कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2020 01:35 AM2020-08-14T01:35:47+5:302020-08-14T01:36:05+5:30

सुमारे २३८४ हजार कर्मचारी बाधित

117 employees of NMC die due to corona | महापालिकेच्या ११७ कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू

महापालिकेच्या ११७ कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू

Next

मुंबई : कोरोनाचा प्रसार मुंबईत आता नियंत्रणात आला आहे. रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधीही ८७ दिवसांवर पोहोचला आहे. मात्र मुंबईला कोरोनामुक्त करण्यासाठी गेले तीन महिने अहोरात्र झटणाºया पालिकेच्या तब्बल ११७ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तर सुमारे २३८४ हजार कर्मचारी बाधित झाले होते. यापैकी १२०० कर्मचारी आता बरे होऊन पुन्हा कामावर रुजू झाले आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेचे ५० हजारहून अधिक कर्मचारी गेले चार महिने काम करीत आहेत. बाधित क्षेत्रांचे सफाई, निर्जंतुकीकरण, औषधांचे व धान्यांचे वाटप आदी काम पालिका कर्मचारी करीत आहेत. या कार्यात पालिकेचे बहुसंख्य कर्मचारी बाधित झाले आहेत. यामध्ये रुग्णांवर उपचार करणाºया डॉक्टर, परिचारिका व इतर वैद्यकीय कर्मचाºयांचे प्रमाण अधिक आहे. तसेच प्रतिबंधित क्षेत्रात काम करणारे सफाई कामगार, अभियंता, सुरक्षा रक्षक, अग्निशमन दलातील जवानांनाही लागण झाली आहे.

घनकचरा खात्यातील कर्मचाºयांमध्ये सर्वाधिक मृत्यूचे प्रमाण आहे. कर्मचारीच नव्हे तर कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये उच्चपदस्थ अधिकाºयांचाही समावेश आहे.

मे महिन्यात करनिर्धारण व संकलन खात्यातील अधिकाºयाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पाणी प्रकल्प विभागाचे उपायुक्त आणि वांद्रे विभागाचे सहायक आयुक्त यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोना लढ्यात मृत्युमुखी पडलेल्या कर्मचारी व अधिकाºयांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५० लाख रुपये नुकसानभरपाई महापालिका प्रशासनामार्फत देण्यात येणार
आहे.

Web Title: 117 employees of NMC die due to corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.