धनंजय मुंडेंची हवीय भेट, बीडच्या 118 वर्षीय दादारावांनी मुंबईच गाठलं थेट
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2019 04:35 PM2019-12-02T16:35:53+5:302019-12-02T16:36:52+5:30
बीड जिल्ह्यातील आष्टी गावच्या 118 वर्षीय स्वातंत्र्यसेनानी दादाराव यांनी धनंजय मुंडेंच्या बीडमधील बंगल्यावर येऊन त्यांची भेट घेतली.
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रसचे आमदार आणि परळी मतदारसंघात पंकजा मुंडेंचा पराभव करणारे नेते धनंजय मुंडेंना सध्या कार्यकर्त्यांकडून भरभरून शुभेच्छा दिल्या जात आहेत. धनंजय मुडेंच्या नेतृत्वाची क्रेझ जशी तरुणांमध्ये आहे, तशीच त्यांच्या नेतृत्वाची आवड वयोवृद्धांनाही आहे. त्यामुळे, धनंजय यांनी मोठ्या फरकाने पंकजा यांचा पराभव करत विधानसभेत पाऊल ठेवलं.
बीड जिल्ह्यातील आष्टी गावच्या 118 वर्षीय स्वातंत्र्यसेनानी दादाराव यांनी धनंजय मुंडेंच्याबीडमधील बंगल्यावर येऊन त्यांची भेट घेतली. खास धनंजय यांची भेट घेण्यासाठीच ते आष्टीहून मुंबईला आले होते. 118 वर्षीय दादाराव यांच्या भेटीने आपण भारावल्याचे धनंजय यांनी म्हटले आहे. एव्हरग्रीन दादांना पाहून, त्याची ऊर्जा पाहून मलाही काम करायला स्फुरण चढल्याचं मुंडेंनी म्हटलंय. मुंडेंनी आपल्या फेसबुक आणि ट्विटर अकाऊँटवरु त्यांच्या शुभेच्छा स्विकारल्याचा फोटो शेअर केला आहे.
वय वर्षं ११८ असलेले हे आमच्या बीड जिल्ह्यातील आष्टी येथील साहेबराव थोरवे दादा. ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी. आजही कशाचाही आधार न घेता फिरतात, पेपर, पुस्तकेही वाचतात. असे एव्हरग्रीन दादा माझे कौतुक करण्यासाठी आले होते. या वयात दादांची ऊर्जा पाहून मलाही काम करायला अजून स्फुरण चढले!
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) December 1, 2019pic.twitter.com/EuPXROYVzY
नाशिकमधील अपंग बांधवाने, जो कॉम्प्युटर इंजिनिअर आहे. त्यानेही धनंजय मुंडेंच्या विजयासाठी ग्रामदेवतेला साकडे घातले होते. नाशिकवरुन येऊन विजय मस्केंनी धनंजय मुंडेंची भेट घेतली. विजय सारखे कार्यकर्ते हीच माझी ऊर्जा असल्याचं सांगत धनंजय यांनी विजयसोबतचा आपला फोटो शेअर केला आहे.
नाशिकचे विजय मस्के, ते स्वतः कॉम्प्युटर इंजिनिअर आहेत. नाशिकला अपंग बांधवासाठी ते काम करतात. माझ्या विजयासाठी त्यांनी त्यांच्या ग्रामदेवतेला साकडे घातले होते.नाशिकवरून येऊन त्यांनी आज मुंबईत माझी भेट घेतली.आनंद वाटला.माझ्यावर जीवापाड प्रेम करणारे हे कार्यकर्ते हीच माझी ऊर्जा आहे. pic.twitter.com/cyy50KrckS
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) December 1, 2019