Join us

धनंजय मुंडेंची हवीय भेट, बीडच्या 118 वर्षीय दादारावांनी मुंबईच गाठलं थेट

By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2019 4:35 PM

बीड जिल्ह्यातील आष्टी गावच्या 118 वर्षीय स्वातंत्र्यसेनानी दादाराव यांनी धनंजय मुंडेंच्या बीडमधील बंगल्यावर येऊन त्यांची भेट घेतली.

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रसचे आमदार आणि परळी मतदारसंघात पंकजा मुंडेंचा पराभव करणारे नेते धनंजय मुंडेंना सध्या कार्यकर्त्यांकडून भरभरून शुभेच्छा दिल्या जात आहेत. धनंजय मुडेंच्या नेतृत्वाची क्रेझ जशी तरुणांमध्ये आहे, तशीच त्यांच्या नेतृत्वाची आवड वयोवृद्धांनाही आहे. त्यामुळे, धनंजय यांनी मोठ्या फरकाने पंकजा यांचा पराभव करत विधानसभेत पाऊल ठेवलं.

बीड जिल्ह्यातील आष्टी गावच्या 118 वर्षीय स्वातंत्र्यसेनानी दादाराव यांनी धनंजय मुंडेंच्याबीडमधील बंगल्यावर येऊन त्यांची भेट घेतली. खास धनंजय यांची भेट घेण्यासाठीच ते आष्टीहून मुंबईला आले होते. 118 वर्षीय दादाराव यांच्या भेटीने आपण भारावल्याचे धनंजय यांनी म्हटले आहे. एव्हरग्रीन दादांना पाहून, त्याची ऊर्जा पाहून मलाही काम करायला स्फुरण चढल्याचं मुंडेंनी म्हटलंय. मुंडेंनी आपल्या फेसबुक आणि ट्विटर अकाऊँटवरु त्यांच्या शुभेच्छा स्विकारल्याचा फोटो शेअर केला आहे.  

नाशिकमधील अपंग बांधवाने, जो कॉम्प्युटर इंजिनिअर आहे. त्यानेही धनंजय मुंडेंच्या विजयासाठी ग्रामदेवतेला साकडे घातले होते. नाशिकवरुन येऊन विजय मस्केंनी धनंजय मुंडेंची भेट घेतली. विजय सारखे कार्यकर्ते हीच माझी ऊर्जा असल्याचं सांगत धनंजय यांनी विजयसोबतचा आपला फोटो शेअर केला आहे. 

 

टॅग्स :धनंजय मुंडेबीडराष्ट्रवादी काँग्रेसआमदारमुंबई