अकरावी ऑनलाइन प्रवेश: १८ हजार विद्यार्थ्यांना मिळाले पहिल्या पसंतीचे महाविद्यालय

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2023 01:10 PM2023-08-05T13:10:53+5:302023-08-05T13:11:20+5:30

पहिल्या विशेष प्रवेश यादीच्या प्रवेशपात्रता गुणांमध्ये (कट ऑफ) सुमारे ५ ते १० टक्क्यांनी मोठी घट झाली होती.

11th Online Admission 18 thousand students got first choice college | अकरावी ऑनलाइन प्रवेश: १८ हजार विद्यार्थ्यांना मिळाले पहिल्या पसंतीचे महाविद्यालय

अकरावी ऑनलाइन प्रवेश: १८ हजार विद्यार्थ्यांना मिळाले पहिल्या पसंतीचे महाविद्यालय

googlenewsNext

मुंबई : अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची दुसरी विशेष गुणवत्ता यादी शुक्रवारी जाहीर झाली. त्यानुसार, एकूण १ लाख २४ हजार ७१५ जागा उपलब्ध होत्या. त्यात पहिल्या फेरीसाठी एकूण ३७ हजार ४७९ विद्यार्थी पात्र होते. त्यातील १८ हजार ४५६ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीची महाविद्यालये मिळाली आहेत.

पहिल्या विशेष प्रवेश यादीच्या प्रवेशपात्रता गुणांमध्ये (कट ऑफ) सुमारे ५ ते १० टक्क्यांनी मोठी घट झाली होती. दुसऱ्या विशेष प्रवेश यादीत नामांकित महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठीच्या प्रवेश पात्रता गुणांमध्ये अवघ्या दोन ते तीन टक्क्यांनी घट झाली आहे. तर काही महाविद्यालयांच्या प्रवेश पात्रता गुणांमध्ये चार ते पाच टक्क्यांनी वाढ झाली आहे.  दुसऱ्या विशेष प्रवेश यादीत महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांना ४ व ५ ऑगस्ट या कालावधीत प्रवेश निश्चित करायचा आहे. संबंधित कनिष्ठ महाविद्यालयामध्ये प्रवेश हवा असल्यास वेळापत्रकात नमूद केलेल्या कालावधीत प्रवेश निश्चित करावा, असे शिक्षण विभागाने म्हटले आहे.

शाखा    उपलब्ध     अर्ज केलेले      अलोटमेंट 
    जागा    विद्यार्थी    मिळालेले विद्यार्थी
कला     २०५४५      २४३९      २१९३ 
वाणिज्य     ६८०२१      २०८९३      १६१३६ 
विज्ञान     ३३६६८      १३७५९      १०००५ 
एचएसव्हीसी     २४८१     ३८९      ३४७ 
एकूण     १२४७१५     ३७४७९      २८६७७ 

मंडळनिहाय विद्यार्थी -
मंडळ    विद्यार्थी
एसएससी     २६५०२ 
सीबीएसई     ९३० 
आयसीएसई     ६३२ 
आयबी     ०३ 
आयजीसीएसई     १०३ 
एनआयओएस     ८२ 
अन्य    ४२५ 
एकूण    २८६७७

-  एकूण उपलब्ध जागा १२४७१५ 
-  दुसऱ्या विशेष गुणवत्ता फेरीसाठी एकूण पात्र विद्यार्थी ३७४७९ 
-  ॲलॉटमेंट झालेले विद्यार्थी २८६७७ 
-  पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळालेले विद्यार्थी १८४५६ 
-  दुसऱ्या पसंतीचे महाविद्यालय मिळालेले विद्यार्थी ४०९१ 
-  तिसऱ्या पसंतीचे महाविद्यालय मिळालेले विद्यार्थी २१४१ 

Web Title: 11th Online Admission 18 thousand students got first choice college

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.