मुंबई : नव्या वर्षाच्या स्वागतासाठी बाहेर पडणाऱ्या प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी ३१ डिसेंबरला रात्री मध्य आणि पश्चिम रेल्वेवर उपनगरी लोकलच्या अतिरिक्त फेऱ्या चालविण्यात येणार आहेत.
मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याणदरम्यान दोन आणि हार्बर मार्गावर सीएसएमटी ते पनवेल दरम्यान दोन अशा चार फेऱ्या चालविण्यात येतील. पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट ते विरार स्थानकांदरम्यान आठ सेवा चालविण्यात येणार आहेत. या अतिरिक्त सेवांची वेळ लवकरच जाहीर केली जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. चर्चगेट, मरिन लाइन्स आणि गिरगाव स्थानकांवर अतिरिक्त बंदोबस्त तैनात असेल.
पश्चिम रेल्वे चर्चगेटवरून विरारसाठी - मध्यरात्री १:१५, २:००, पहाटे ३:२५ व ४:१० विरारवरून चर्चगेटसाठी- मध्यरात्री १२:१५, १२:४५, १:४० आणि पहाटे ३:०५
मध्य रेल्वे सीएसएमटी ते कल्याण (अप आणि डाऊन) मध्यरात्री ०१:३०
हार्बर मार्ग सीएसएमटी ते पनवेल (अप आणि डाऊन) मध्यरात्री ०१:३०