तस्करीसाठी आणलेले १२ कोटींचे हेरॉइन जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2020 06:53 AM2020-01-06T06:53:09+5:302020-01-06T06:53:33+5:30

नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यातच अमली पदार्थविरोधी पथकाने हेरॉइन तस्करीचे मोठे जाळे उद्ध्वस्त करत पुरवठा करणाऱ्यांनाच दणका दिला आहे.

12 crore heroin seized for smuggling | तस्करीसाठी आणलेले १२ कोटींचे हेरॉइन जप्त

तस्करीसाठी आणलेले १२ कोटींचे हेरॉइन जप्त

Next

मुंबई : नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यातच अमली पदार्थविरोधी पथकाने हेरॉइन तस्करीचे मोठे जाळे उद्ध्वस्त करत पुरवठा करणाऱ्यांनाच दणका दिला आहे. या कारवाईत तब्बल १२ कोटी किमतीचे ६ किलो हेरॉइन जप्त करून मुंबईतील दोन पुरवठादारांना बेड्या ठोकल्या आहेत. राजस्थानमधून हा साठा मुंबईत आणण्यात आला होता.
मालाडचा राजेश तुलसीदास जोशी (५०) तर गोराईतील कृष्णमूर्ती मुत्तीसवई कवांदर (४२) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. शनिवारी हे दोघे अमली पदार्थाच्या तस्करीसाठी येणार असल्याची माहिती अमली पदार्थविरोधी पथकाचे पोलीस उपायुक्त शिवदीप लांडे यांना मिळाली. त्यानुसार, त्यांच्या मार्गदर्शनाखाली एएनसीच्या वांद्रे पथकाने मालाड रेल्वे स्थानकाबाहेर सापळा रचून दोघांना अटक केली. यापैकी जोशीकडून ४ किलो, तर कृष्णमूर्तीकडून २ किलो हेरॉइन हस्तगत करण्यात आले आहे. राजस्थानमधून हा साठा मुंबईत आणण्यात आला. हा साठा मुंबईत उतरताच अवघ्या १० मिनिटांत संबंधित ठिकाणी पोहोचविण्याची जबाबदारी जोशीवर होती. ठरलेल्या ठिकाणी ड्रग्ज पोहोचताच त्यात भेसळ करत, पुढे हे ड्रग्ज मानखुर्द ते बोरीवलीतील विविध भागांत तस्कर, ग्राहक, वितरकांच्या साखळीद्वारे पोहोचविण्यात येत असत. जोशी आणि कवांदर हे दोघेही पडद्यामागून काम करत होते. त्यांच्या मुख्य सूत्रधाराचा शोध सुरू आहे. दोघांनाही ९ तारखेपर्यंत पोलीस कोठडी मिळाली असून, अधिक तपास सुरू आहे.
मुंबईत वर्षभरात तस्करीसाठी येणाºया हेरॉईनच्या एकूण साठ्यापैकी या कारवाईत ८० टक्के हेरॉईन जप्त करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त शिवदीप लांडे यांनी दिली आहे. या कारवाईमुळे ड्रग्ज पुरवठादारांचे धाबे दणाणले असून, भविष्यात मुंबईतील ड्रग्ज तस्करांवर वचक बसविण्यासाठी ही कारवाई मोलाची ठरणार असल्याचा विश्वासही एएनसीकडून वर्तविण्यात येत आहे.

Web Title: 12 crore heroin seized for smuggling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.