Join us

१५ दिवसांत १२ डबा लोकल

By admin | Published: April 14, 2016 1:42 AM

हार्बर मार्गावर पहिली १२ डब्यांची लोकल येत्या १५ दिवसांत धावेल, असे आश्वासन मध्य रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आले आहे. बारा डब्यांची लोकल चालवण्यासाठी आवश्यक असलेली

मुंबई : हार्बर मार्गावर पहिली १२ डब्यांची लोकल येत्या १५ दिवसांत धावेल, असे आश्वासन मध्य रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आले आहे. बारा डब्यांची लोकल चालवण्यासाठी आवश्यक असलेली बहुतांश कामे पूर्ण करण्यात झाली आहेत. डॉकयार्ड स्थानकातील कामेही मार्गी लागली आहेत, अशी माहीती विभागीय रेल्वे व्यवस्थापक अमिताभ ओझा यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्यामुळे पहिली बारा डबा लोकल त्वरीत सुरू केल्यानंतर काही दिवस ही एकच लोकल चालविण्यात येईल आणि त्यानंतर गाड्यांमध्ये वाढ करण्यात येणार आहे. हार्बर मार्गावर १२ डबा लोकल चालविण्यासाठी फलाटांची लांबी वाढवणे आवश्यक होते. सीएसटी आणि डॉकयार्ड स्थानक वगळता अन्य स्थानकातील कामे पूर्ण करण्यात आली. तर सीएसटी स्थानकातील प्लॅटफॉर्मचे काम हे ७२ तासांचा ब्लॉक घेऊन मार्गी लावण्यात आले. एलिव्हेटेड स्थानक असलेल्या डॉकयार्ड स्थानकात प्लॅटफॉर्मची लांबी वाढविताना मोठी अडचण येत होती. परंतु ते कामही वेगाने पूर्ण करण्यात येत असून जवळपास ८0 टक्क्यांपेक्षा जास्त काम झाल्याचे ओझा यांनी सांगितले. त्यामुळे आता १२ डबा लोकल चालवण्याचा मार्गही मोकळा झाला आहे. सध्या हार्बरवर नऊ डब्यांच्या ३६ लोकल धावत असून त्यांच्या रोज एकूण ५९0 फेऱ्या होतात. ३६ लोकलला प्रत्येकी तीन डबे जोडल्यास प्रवासी क्षमता ३३ टक्क्यांनी वाढणार आहे, असे आश्वासन ओझा यांनी दिले.प्रकल्पाला विलंबहार्बरवरील १२ डबा लोकलचा प्रकल्प डिसेंबर २0१४ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु दीड वर्ष विलंब झाला. तीन स्थानकांतील फलाटांची लांबी वाढविणे व अन्य तांत्रिक कामांमुळेच हा वेळ लागल्याचे मध्य रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले. सीएसटी स्थानकातील प्लॅटफॉर्मचे काम करण्यासाठी ४0 दिवसांचा ब्लॉक घेण्याचे नियोजन होते. त्यानंतर सात दिवसांच्या ब्लॉकचेही नियोजन करण्यात आले. मात्र प्रवाशांना होणारा मनस्ताप पाहता अवघ्या ७२ तासांत हे काम पूर्ण करण्यात आल्याचेही सांगण्यात आले. १हार्बरवरील डीसी-एसी परिवर्तन पूर्ण करण्यात आल्यानंतर आता या मार्गावरील लोकलचा वेग वाढविण्यासाठी मध्य रेल्वेकडून प्रयत्न केले जाणार आहेत. सध्या हार्बरवरील रुळाच्या वेगाची (ट्रॅक स्पीड) क्षमता ही ताशी ८0 किमीपर्यंत असून ती १00 किमीपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी मानखुर्द ते पनवेलपर्यंतच्या ट्रॅकचा अभ्यास करण्यात आल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले. २मध्य रेल्वचे विभागीय व्यवस्थापक अमिताभ ओझा यांनी सांगितले की, ‘मानखुर्द ते पनवेलपर्यंत रुळांचा वेग वाढविण्याचा प्रस्ताव आहे. या भागातील रुळांचा अभ्यासही करण्यात आला आहे. वेग वाढविण्याचे काम पावसाळ्यानंतर सुरू केले जाईल. काम पूर्ण झाल्यानंतर ट्रॅकची चाचणीही घेतली जाईल. सीएसटी ते मानखुर्दपर्यंतची स्थानके जवळजवळ असून मानखुर्द ते पनवेल दरम्यान दोन स्थानकांमधील अंतर जास्त आहे. ३त्यामुळे प्रथम मानखुर्द ते पनवेलपर्यंतच्या ट्रॅकचा वेग वाढविण्यावर भर दिला जात आहे. वेग वाढविण्यासाठी रुळांमध्ये मोठ्या प्रमाणात खडी टाकणे, वळणांवरील रुळांच्या आतील व बाहेरील बाजूंची वक्रता तपासणे आदी कामांचा समावेश आहे. सध्या हार्बरवरील लोकलचा वेग हा जास्तीत जास्त ताशी ६0 ते ७५ पर्यंत जातो. ट्रॅकचा वेग आणखी वाढल्यास हार्बरवरील लोकलचा वेगही वाढविण्यास मदत होईल.’या कामांमुळे मानखुर्द ते पनवेल टप्प्यात प्रत्येक स्थानकांदरम्यान ३0 ते ४0 सेकंदाचा वेळ वाचेल. चार महिन्यांत सर्व लोकल १२ डबा : हार्बर मार्गावर येत्या चार महिन्यांत सर्व ३६ लोकल बारा डब्यांमध्ये रुपांतरीत होतील. ते काम टप्प्याटप्यात पूर्ण केले जाईल. पश्चिम रेल्वेकडून सिमेन्स लोकल मध्य रेल्वेला मिळत आहेत. त्यांची संख्या जशी वाढेल त्याप्रमाणे हार्बरवर १२ डब्यांच्या लोकलमध्ये वाढ केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. 36 नऊ डबा लोकलच्या ५९0 फेऱ्या सध्या हार्बर मार्गावर होतात.25 रेट्रोफिटेड सध्या जुन्या लोकल आहेत.5-7 वर्षे एवढे साधारणपणे या जुन्या लोकलचे आर्युमान आहे. त्यामुळे त्या लवकरच मोडीत निघतील.