Join us

‘त्या’ सयामी जुळ्यांवर १२ तासांची यशस्वी शस्त्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2018 1:56 AM

सयामी जुळ्यांना वेगळे करण्यासाठी झालेल्या शस्त्रक्रियेला सहा आठवडे उलटले असून, आता लव्ह आणि प्रिन्स या जुळ्या भावंडांना परळच्या रुग्णालयातून घरी पाठवण्याची वेळ आली आहे.

मुंबई : सयामी जुळ्यांना वेगळे करण्यासाठी झालेल्या शस्त्रक्रियेला सहा आठवडे उलटले असून, आता लव्ह आणि प्रिन्स या जुळ्या भावंडांना परळच्या रुग्णालयातून घरी पाठवण्याची वेळ आली आहे. लव्ह आणि प्रिन्स यांचे यकृत, आतडे आणि मूत्राशय ही तीन इंद्रिये सामाईक होती. ती या शस्त्रक्रियेद्वारे वेगळी करण्यात रुग्णालयाला यश आले आहे. ही दोन्ही बाळे आता आधार घेऊन उभे राहत असून लवकरच चालायला लागतील.परळ येथील रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले की, वैद्यकीय परिभाषेत त्यांना झिफीओंफलॉयशिओपॅगस, टेट्रापस जोडलेली जुळी असे म्हणतात. ही मुलांची प्रकृती शस्त्रक्रियेनंतर सामान्य होईपर्यंतचा काळ स्थिर पण दीर्घ होता. आठवडाभर ती कृत्रिम श्वसन यंत्रणेवर होती आणि मग तीन आठवडे अतिदक्षता विभागात होती. त्यांच्या जखमा बºया करणेही खूप कठीण होते. कारण, त्यांचे पोट उघडून ठेवलेले होते आणि ते केवळ जाळीने झाकलेले होते. अ‍ॅनेस्थेशिया देऊन त्यांना अनेकदा ड्रेसिंग करण्यात आले. निर्वात ड्रेसिंग्ज आणि कोलेजनचा उपयोग करून त्यांना ड्रेसिंग करण्यात येत होते आणि आश्चर्य म्हणजे कोणतीही गुंतागुंत न होता ते यातून बाहेर आले. जखमा आता जवळपास भरून आल्या आहेत आणि हे कुटुंब आता घरी जाण्यासाठी तयार आहे.या मुलांना आता दोघांत मिळून एक डायपर वापरावे लागणार नाही, खरेतर डायपर्स वापरावेच लागणार नाहीत. कारण, त्यांच्या वयाच्या इतर मुलांप्रमाणे आता त्यांची लघवी आणि प्रात:विधी नियंत्रण आले आहे. या मुलांच्या फॉलोअपसाठी बहुअंगी पुनर्वसन कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. यामध्ये त्यांची वाढ, विकास, पोषण, यकृताचे कार्य, लसीकरण आणि त्यांच्या कमरेखालील अवयवांसाठी व्यायाम यांचा समावेश करण्यात आला आहे. आणखी एक वर्षाने हाडांच्या फेररचनेसाठी (आॅस्टिओटॉमी) त्यांच्यावर आणखी एक शस्त्रक्रिया करावी लागेल. यामध्ये त्यांची उदरे पुन्हा एकदा बंद केली जातील आणि मग ते शब्दश: धावत शाळेत जाऊ शकतील. रुग्णालयाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिनी बोधनवाला म्हणाल्या, सयामी जुळ्यांना वेगळे करण्याची ही तिसरी यशस्वी शस्त्रक्रिया आहे. या बाळांना रुग्णालयातून घरी सोडले जाणार आहे हे सांगताना आनंद होत आहे. ही शस्त्रक्रिया आव्हानात्मक होती. पण वैद्यकीय पथकाने आणि परिचर्या कर्मचाºयांनी या रुग्णांची खूप छान काळजी घेतली आणि आता ते घरी जाण्यास तयार आहेत.>पालक म्हणतात...या बाळांचे पालक शीतल आणि सागर झाल्टे म्हणतात, बाळांना आधार घेऊन, अडखळत अडखळत उभे राहताना बघून खूप आनंद होत आहे. ते दोघे अगदी निरोगी आणि आनंदी आहेत. त्यामुळे ते आता घरी जाणार आहेत. आमच्या बाळांची रिकव्हरी उत्तम आहे. बाळांवर शस्त्रक्रिया करणे खूप आव्हानात्मक होते; पण रुग्णालयाने ते अविरत प्रयत्नांनी साध्य केले आहे.>१२ तास चालली शस्त्रक्रिया१२ डिसेंबर २०१७ रोजी झाली होती यशस्वी शस्त्रक्रिया, दोन्ही बाळे लवकरच आपल्या घरी जाणारफुप्फुस, पोटातील आतडे व पोटाच्या खालच्या भागापासून चिकटलेल्या अवस्थेतील या जुळ्या मुलांवर१२ तास शस्त्रक्रिया करण्यात आलीएक वर्षानंतर हाडांच्या फेररचनेसाठी एक शस्त्रक्रिया करावी लागणार, त्यानंतर दोघेही सर्वसाधारण मुलांप्रमाणे शाळेत जाऊ शकतील.