Join us

रोहित पवार यांची १२ तास ईडी चौकशी, रात्री सव्वा दहाच्या दरम्यान कार्यालयाबाहेर

By मनोज गडनीस | Published: January 24, 2024 10:17 PM

यावेळी सुप्रिया सुळे आणि जितेंद्र आव्हाड तेथे उपस्थित होते. 

मुंबई- राष्ट्रवादी कॉँग्रेसचे आमदार रोहित पवार यांची बुधवारी ईडीच्या अधिकाऱ्यांनी १२ तास चौकशी केली. सकाळी साडे दहाच्या दरम्यान ते ईडीच्या दक्षिण मुंबईतील बॅलोर्ड पीयर येथे असलेल्या कार्यालयात दाखल झाले. रात्री सव्वा दहाच्या दरम्यान ते ईडीच्या कार्यालयाबाहेर पडले. यावेळी सुप्रिया सुळे आणि जितेंद्र आव्हाड तेथे उपस्थित होते. 

तत्पूर्वी, सकाळी ईडी कार्यालयात प्रवेश करण्यापूर्वी रोहित पवार यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, ईडीच्या अधिकाऱ्यांना ज्या प्रश्नांची उत्तरे हवी आहेत, ती सर्व कागदपत्रे व फाईल्स मी सोबत आणल्या आहेत. ईडीच्या अधिकाऱ्यांना मी संपूर्ण सहकार्य करेन व त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देईन. अधिकारी त्यांचे काम करत आहेत. मला त्यांच्याविषयी काहीही भाष्य करायचे नाही. 

हे प्रकरण महाराष्ट्र राज्य सहकारी शिखर बँकेत झालेल्या कथित आर्थिक घोटाळ्याशी संबंधित आहे. या प्रकरणी ५ जानेवारी रोजी ईडीच्या अधिकाऱ्यांनी रोहित पवारांच्या बारातमी ॲग्रो कंपनीसह सहा ठिकाणी छापेमारी केली होती.

टॅग्स :रोहित पवारअंमलबजावणी संचालनालयमुंबई