Join us  

पोलिसांच्या टिष्ट्वटरवर १२ लाख फॉलोअर्स

By admin | Published: January 05, 2017 6:00 AM

नागरिकांशी कनेक्ट होण्यासाठी मुंबई पोलिसांनी सुरू केलेल्या टिष्ट्वटर अकाउंटवर गेल्या वर्षभरात १२ लाखांहून अधिक फॉलोअर्स जोडले गेले आहेत.

मुंबई : नागरिकांशी कनेक्ट होण्यासाठी मुंबई पोलिसांनी सुरू केलेल्या टिष्ट्वटर अकाउंटवर गेल्या वर्षभरात १२ लाखांहून अधिक फॉलोअर्स जोडले गेले आहेत. ‘टिवटिव’ला मिळणाऱ्या तत्काळ प्रतिसादामुळे नागरिकांचा मुंबई पोलिसांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला. विविध विषयांच्या जनजागृतीबरोबर पोलिसांच्या चांगल्या कामांना कौतुकाची थाप देण्यासाठी हे टिष्ट्वटर हॅण्डल मोलाची भूमिका बजावित आहे.सोशल मीडियाचा वाढता विस्तार आणि वापर लक्षात घेता पोलीसही टेक्नोसॅव्ही होत आहेत. यातच त्यांनी २८ डिसेंबर रोजी मुंबई पोलीस आणि पोलीस आयुक्तांचे टिष्ट्वटर अकाउंट सुरू केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते याचा शुभारंभ करण्यात आला. मुंबई पोलिसांचे @े४ेुं्रस्रङ्म’्रूी हे टिष्ट्वटर हँडल सुरू केल्याच्या काही तासांत फॉलोवर्सने पाच हजारांचा आकडा पार केला होता. नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी टिष्ट्वटर अकाउंटचा फायदा मोठ्या प्रमाणात झाला. गेल्या वर्षभरात अनेक चांगल्या-वाईट चर्चांनी टिष्ट्वटरवरची ‘टिवटिव’ वाढली. गेल्या वर्षभरात पाहता पाहता १२ लाख ९ हजार फॉलोवर्स याला जोडले गेले. तर १५ हजार लोकांनी टिष्ट्वट केले. ५९१ जणांनी या अकाउंटला लाइक केले आहे. याच टिष्ट्वटमधून पोलिसांनी विविध गुन्ह्यांची उकल केली.