Join us

नगरमधून १२ आमदार निवडून आणणार! नीलेश लंके यांनी घेतली ठाकरे यांची भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2024 07:44 IST

नगरमधून १२ आमदार निवडून आणणार असा विश्वास नीलेश लंके यांनी व्यक्त केला.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार सुजय विखे पाटील यांचा पराभव करीत विजय मिळवणारे शरद पवार गटाचे उमेदवार नीलेश लंके यांनी उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी भेट घेतली. यावेळी एका सामान्य कुटुंबातील शिवसैनिक खासदार झाला, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी आपले अभिनंदन केल्याचे सांगतानाच नगरमधून १२ आमदार निवडून आणणार असा विश्वास नीलेश लंके यांनी व्यक्त केला.

मातोश्रीबाहेर नीलेश लंके यांच्या स्वागताचे बॅनर झळकविण्यात आले होते. भेटीविषयीची माहिती देताना ते म्हणाले, उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यानंतर मला त्यांनी सांगितलं की महाविकास आघाडीच्या प्रचाराची सुरुवात आपल्याला नगरमधून करायची आहे. त्यामुळे नगरमध्ये लवकरच मोठा मेळावा आयोजित केला जाईल. या मेळाव्याला उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीचे नेते उपस्थित राहतील. विधानसभा निवडणुकीत नगर जिल्ह्यातील १२ आमदार निवडून आणण्याचा निर्धार आम्ही केला आहे, असे लंके म्हणाले.

टॅग्स :निलेश लंकेउद्धव ठाकरे