मुंबईत गोवराचे आणखी १२ रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2022 07:58 AM2022-11-17T07:58:43+5:302022-11-17T07:59:08+5:30

Mumbai: शहरात गोवरची साथ वेगाने पसरत असून, या रुग्णांची संख्या १६४ झाली आहे. पालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या अहवालानुसार, शहर, उपनगरांत दिवसभरात १२ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.

12 more measles patients in Mumbai | मुंबईत गोवराचे आणखी १२ रुग्ण

मुंबईत गोवराचे आणखी १२ रुग्ण

googlenewsNext

मुंबई : शहरात गोवरची साथ वेगाने पसरत असून, या रुग्णांची संख्या १६४ झाली आहे. पालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या अहवालानुसार, शहर, उपनगरांत दिवसभरात १२ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. याखेरीज, ताप व पुरळ असलेल्या सात संशयित रुग्णांच्या आधीच्या मृत्यूप्रकरणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर या मृत्यूचे निश्चित निदान प्राप्त होईल, असे पालिका प्रशासनाने कळविले आहे.
गोवरच्या साथीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पालिकेने कंबर कसली असून, भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय, कांदिवली- २ रुग्णशय्या सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना तसेच राजावाडी रुग्णालय ५ रुग्णशय्या, शताब्दी रुग्णालय गोवंडी १० रुग्णशय्या येथे गंभीर रुग्णांना आणि कस्तुरबा रुग्णालय ८३ रुग्णशय्या अतिगंभीर रुग्णांना उपचारासाठी दाखल करण्यासाठी उपलब्ध आहेत. तसेच कस्तुरबा रुग्णालय येथे पाच व्हेंटिलेटरची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.  यासाेबतच झोपडपट्ट्यांमध्ये घराेघरी जाऊन रुग्णांचा शाेध घेण्याचे काम सुरु आहे. 

गोवर उद्रेक असलेले विभाग
n एम पूर्व, ई, एफ उत्तर जी दक्षिण एल एम पश्चिम, पी उत्तर, एच 
n ऑक्सिजनवर उपचार सुरू असलेले रुग्ण ४ 
n संशयित मृत्यू ७ 
n दिवसभरात निदान झालेले रुग्ण १२ 
गोवराची साथ आटोक्यात यावी म्हणून मुंबई पालिकेने मोठ्या प्रमाणात लसीकरण सुरू केले आहे. त्यानंतर रूग्णांची संख्या वाढते आहे.

वर्ष                                   २०२०      २०२१    २०२२ 
एकूण ताप, पुरळाचे रुग्ण        २७९    ४०८          १०७९ 
निदान झालेले गोवरचे रुग्ण      २५          ०९    १६४ 

Web Title: 12 more measles patients in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.