म्हाडाकडून १२ हजार १६० अर्ज निकाली

By admin | Published: August 29, 2016 05:52 AM2016-08-29T05:52:43+5:302016-08-29T05:52:43+5:30

म्हाडातर्फे मुंबईस्थित मुख्यालयासह राज्यभरातील विभागीय मंडळांमध्ये सुरू करण्यात आलेल्या आॅनलाइन लोकसेवा सुविधा केंद्रांना नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे

12 thousand 160 applications were received from MHADA | म्हाडाकडून १२ हजार १६० अर्ज निकाली

म्हाडाकडून १२ हजार १६० अर्ज निकाली

Next

मुंबई : म्हाडातर्फे मुंबईस्थित मुख्यालयासह राज्यभरातील विभागीय मंडळांमध्ये सुरू करण्यात आलेल्या आॅनलाइन लोकसेवा सुविधा केंद्रांना नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. मागील वर्षभरात म्हाडाच्या मुंबईस्थित मुख्यालयासह राज्यातील सर्व विभागीय मंडळांकडे प्राप्त झालेल्या १६ हजार ४११ अर्जांपैकी १२ हजार १६० अर्ज निकाली काढण्यात आले आहेत.
या सुविधेअंतर्गत आतापर्यंत मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाकडे एकूण ८ हजार ३६१ अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी ६ हजार ११३ अर्ज निकाली काढण्यात आले. मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाने १ हजार ८२ अर्जांपैकी ६७० अर्ज निकाली काढले आहेत. कोकण मंडळाने १ हजार ६४२पैकी ९५३ अर्ज निकाली काढले आहेत.
पुणे मंडळाने २ हजार १०८पैकी १ हजार ६२१ अर्ज निकाली काढले आहेत. नागपूर मंडळाने १ हजार २२२पैकी १ हजार १६१ अर्ज निकाली काढले आहेत. औरंगाबाद मंडळाने १ हजार २५१पैकी १ हजार १४ अर्ज निकाली काढले आहेत. नाशिक मंडळाने ४२२पैकी ३१८ अर्ज निकाली काढले आहेत. अमरावती मंडळाने ३२३पैकी ३१० अर्ज निकाली काढले आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: 12 thousand 160 applications were received from MHADA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.