Join us

गोदी कामगारांना १२ हजार रुपये बोनस

By सचिन लुंगसे | Published: October 18, 2022 9:11 PM

मुंबई पोर्ट प्राधिकरणाचे चेअरमन राजीव जलोटा यांनी गेल्यावर्षीप्रमाणे १२ हजार रुपये ॲडव्हान्स बोनस दिवाळीपूर्वी देण्याचे मान्य केले असून, तसे आदेश  प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिले आहेत.

मुंबई :  

मुंबई पोर्ट प्राधिकरणाचे चेअरमन राजीव जलोटा यांनी गेल्यावर्षीप्रमाणे १२ हजार रुपये ॲडव्हान्स बोनस दिवाळीपूर्वी देण्याचे मान्य केले असून, तसे आदेश  प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्याचप्रमाणे कामावर असलेल्या कामगारांना व पेन्शनर्सना मागील  वेतन कराराची  १० टक्के थकबाकी देण्याचे मान्य केले आहे.

 भारतातील बंदर व गोदी कामगारांच्या  पी.एल.आर. ( बोनस ) बाबत  व्हर्चुअल मिटिंग झाली. या मिटिंगमध्ये ज्येष्ठ कामगार  नेते ॲड. एस. के.  शेट्ये यांनी ॲडव्हान्स बोनस देण्याची मागणी केली होती. या सदर्भात मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे सेक्रेटरी व मुंबई पोर्ट प्राधिकरणाचे कामगार सदस्य  दत्ता खेसे व ट्रान्सपोर्ट अँड डॉक वर्कर्स युनियनचे जनरल सेक्रेटरी  केरसी पारेख यांनी १८ ऑक्टोबर २०२२ रोजी मुंबई पोर्ट प्राधिकरणाचे  चेअरमन राजीव जलोटा यांची भेट घेऊन गोदी कामगारांना १५ हजार रूपये ॲडव्हान्स बोनस व ८० टक्के थकबाकी देण्याची मागणी केली होती. 

मुंबई पोर्ट ट्रस्टकडे पैसे आल्यानंतर उर्वरीत थकबाकी देण्यात येईल.  गोदी कामगारांना दिवाळीपूर्वी १२  हजार रुपये  ॲडव्हान्स बोनस व १० टक्के  थकबाकी मिळत असल्यामुळे गोदी कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

टॅग्स :मुंबई