१२ हजार वैज्ञानिकांचा मेळावा
By admin | Published: January 3, 2015 02:17 AM2015-01-03T02:17:39+5:302015-01-03T02:17:39+5:30
तब्बल ५४ वर्षांनंतर मुंबई विद्यापीठाला इंडियन सायन्स काँग्रेसचे यजमानपद लाभले आहे.
मुंबई : तब्बल ५४ वर्षांनंतर मुंबई विद्यापीठाला इंडियन सायन्स काँग्रेसचे यजमानपद लाभले आहे. विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये ३ ते ७ जानेवारीदरम्यान पार पडणाऱ्या कार्यक्रमाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी सकाळी ९ वाजता होणार आहे. पाच दिवस चालणाऱ्या या मेळाव्यात देशविदेशातील सुमारे १२ हजारांहून अधिक वैज्ञानिक सहभागी होणार आहेत.
गेल्या काही दिवसांपासून सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या इंडियन सायन्स काँग्रेसचे उद्घाटन शनिवारी पार पडणार आहे. ‘मानवी विकासासाठी विज्ञान व तंत्रज्ञान’ ही या वेळच्या सायन्स काँग्रेसची थीम आहे. देशविदेशातील विज्ञान आणि
तंत्रज्ञान क्षेत्रातील सुमारे १२ हजारांहून अधिक वैज्ञानिक आणि ११ नोबेल लॉरेट या सायन्स काँग्रेसमध्ये सहभागी होणार आहेत. या परिषदेमध्ये ३२ चर्चासत्रे आणि १४ परिसवांदांचे आयोजन करण्यात आले आहे, ज्यामध्ये अॅग्रिकल्चर अँड फॉरेस्ट्री सायन्स, अॅनिमल, वेटर्नरी अँड
फिशरी सायन्स, अॅन्थ्रोपॉलॉजी
अन्ड बिहेवियर सायन्स, केमिकल सायन्स, अर्थ सिस्टीम सायन्स, इंजिनीअरिंग सायन्स, एन्व्हायर्नमेंट सायन्स, इन्फॉर्मेशन अॅन्ड कम्युनिकेशन सायन्स अॅन्ड टेक्नॉलॉजी, मटेरिअर सायन्स, मॅथेमेटिकल सायन्स, न्यू बॉयोलॉजी, फिजिकल सायन्स, प्लांट सायन्स असे १४ विभाग असणार आहेत.
तर ३२ सिंपोझिया असणार आहेत, ज्यामध्ये देशविदेशातील जवळपास १५० हून अधिक वैज्ञानिक मार्गदर्शन करणार आहेत. त्याचबरोबर राष्ट्रीय किशोर वैज्ञानिक संमेलन आयोजित करण्यात आले असून, वांद्रे-कुर्ला संकुलातील एमएमआरडीए मैदानावर विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन शनिवारी ११.३0 वाजता करण्यात येणार आहे. तर वूमन सायन्स काँग्रेसचे उद्घाटन रविवारी करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)
परिषदेचे उद्घाटन सकाळी ९ वाजता कलिना कॅम्पसमधील मुख्य सभा मंडपात होईल. त्यानंतर एमएमआरडीए मैदानातील प्रदर्शनाचे उद्घाटन ११.३0 वाजता होईल.
मुख्य सभा मंडपात दुपारी १२ वाजताच्या सत्रात मंगळ यान मोहिमेविषयी के. राधाकृष्णन मार्गदर्शन करणार आहेत.
सायं. ६.१५ वा. मुख्य मंडपामध्ये नोबेल पारितोषिक विजेते मोहमद युनूस यांचे व्याख्यान होईल. सायंकाळी ७ वा. सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.