टाटा रुग्णालयाला १२० कोटीची जागा दान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:08 AM2021-09-06T04:08:48+5:302021-09-06T04:08:48+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कर्करुग्णांवर उपचार करणारे टाटा मेमोरियल रुग्णालय हे देशातील सर्वात मोठे रुग्णालय आहे. याठिकाणी वर्षाला ...

120 crore land donated to Tata Hospital | टाटा रुग्णालयाला १२० कोटीची जागा दान

टाटा रुग्णालयाला १२० कोटीची जागा दान

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कर्करुग्णांवर उपचार करणारे टाटा मेमोरियल रुग्णालय हे देशातील सर्वात मोठे रुग्णालय आहे. याठिकाणी वर्षाला सुमारे ७५ हजार नव्या रुग्णांवर उपचार केले जातात, तर वर्षभरात साडेचार लाख रुग्ण नंतरच्या उपचारांसाठी येऊन जातात. त्यामुळे उपचार घेऊ इच्छिणाऱ्या रुग्णांची यादी मोठी असल्याने अनेकांना अनेकदा वाट पाहात थांबावे लागते. त्यावर उपाय म्हणून मुंबईतील एका दानशूर महिलेने तिच्या मालकीची सुमारे १२० कोटी रुपये किमतीची जमीन टाटा रुग्णालयाला केमोथेरपी केंद्र सुरू करण्यासाठी दिली आहे, तर आणखी १८ दानशूर व्यक्तींनी त्याठिकाणी केंद्राच्या बांधकामासाठी एकत्रितपणे देणगी दिली आहे.

मुंबईतील ६१ वर्षांच्या दीपिका मुंडले यांनी त्यांची वडिलोपार्जित ३० हजार चौरस फुटाची जागा डाटा रुग्णालयाला देणगी म्हणून दिली आहे. सध्याच्या टाटा रुग्णालयापासून ही जागा फक्त ४०० मीटर अंतरावर आहे. नवे केमोथेरपी केंद्र झाल्यानंतर सध्या असलेल्या व्यवस्थेवरील ताण मोठ्या प्रमाणावर कमी होणार आहे. सध्या रुग्णालयात केमोथेरपीसाठी १०० बेड असून, रोज ५०० रुग्णांना केमोथेरपी दिली जाते, असे असले तरी आजही रुग्णांना केमोथेरपीसाठी ३० दिवसांची वाट पाहावी लागते.

त्याचबरोबर पश्चिम आशियातील देशांतून तसेच आफ्रिका खंडातील अनेक देशांमधील रुग्णांनाही याठिकाणी उपचार हवे असतात. रुग्णालयातील वऱ्हांडे कायम रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनी गजबजलेले असतात. कुणी ॲडमिट होण्याची वाट पाहात असतात, तर अनेकजण पाठपुराव्याच्या उपचारासाठी आलेले असतात, इथला केमोथेरपी उपचार विभाग कायम व्यस्त असतो.

नव्या केंद्रात २०० रुग्णांवर केमोथेरपीचे उपचार शक्य

नव्या केंद्रात केमोथेरपीसाठी ५६ बेड असतील आणि रोज याठिकाणी २०० रुग्णांवर केमोथेरपीचे उपचार करणे शक्य होणार आहे. त्याचबरोबर याठिकाणी होणाऱ्या इमारतीत समुपदेशन दालने, केमोथेरपीनंतर लागणाऱ्या रिकव्हरी रुम्स आणि कौशल्य विकास प्रयोगशाळा असणार आहे. या प्रयोगशाळेतून डॉक्टरांना कर्करोगावरील अत्याधुनिक उपचारांचे प्रशिक्षण मिळणार आहे. दोन मजले डॉक्टरांच्या निवासस्थानांसाठी राखून ठेवण्यात येणार आहेत.

Web Title: 120 crore land donated to Tata Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.