Join us

राज्यात दिवसभरात १२० मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 4:06 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यात गुरुवारी ७ हजार ३०२ रुग्ण आणि १२० रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आता ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यात गुरुवारी ७ हजार ३०२ रुग्ण आणि १२० रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आता राज्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या ६२ लाख ४५ जार ५७ झाली असून, मृतांचा एकूण आकडा १ लाख ३१ हजार ३८ झाला आहे. सध्या राज्यात ९४ हजार १६८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.३४ टक्क्यांवर पोहोचले असून, मृत्यूदर २.०९ टक्के आहे.

राज्यात दिवसभरात ७ हजार ७५६ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, आतापर्यंत एकूण ६० लाख १६ हजार ५०६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४ कोटी ६२ लाख ६४ हजार ५९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १३.५ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ५ लाख ५१ हजार ८७२ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत, तर ३ हजार ७४३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

दिवसभरात नोंद झालेल्या १२० मृत्यूंमध्ये मुंबई १०, नवी मुंबई मनपा ३, कल्याण डोंबिवली मनपा ७, वसई विरार मनपा ११, रायगड २, पनवेल मनपा २, अहमदनगर ६, अहमदनगर मनपा १, जळगाव १, पुणे ४, पुणे मनपा १, पिंपरी-चिंचवड मनपा १, सोलापूर ४, कोल्हापूर ८, कोल्हापूर मनपा ४, सांगली १०, सांगली मिरज कुपवाड मनपा ५, सिंधुदुर्ग १२, रत्नागिरी ६, औरंगाबाद २, औरंगाबाद मनपा ६, उस्मानाबाद ३, गोंदिया १, चंद्रपूर १ इ. रुग्णांचा समावेश आहे.

राज्यात ४ हजार ४६६ रुग्ण गंभीर अवस्थेत

राज्यातील उपचाराधीन रुग्णांमध्ये ६४.५५ टक्के रुग्ण लक्षणे विरहित व लक्षणे असलेले आहेत, या रुग्णांची संख्या सुमारे २३ हजार ६२९ आहे, तर १२.२० टक्के रुग्ण गंभीर अवस्थेत आहेत, या रुग्णांची संख्या ४ हजार ४६६ इतकी आहे. याखेरीज, २३.२५ टक्के रुग्ण अतिदक्षता विभागाबाहेरऑक्सिजनवर आहेत, ही रुग्णसंख्या ८ हजार ५११ आहे.