पोर्नोग्राफी प्रकरणात १२० पोर्न व्हिडीओ गुन्हे शाखेच्या हाती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:07 AM2021-07-28T04:07:01+5:302021-07-28T04:07:01+5:30
शिल्पा शेट्टीला अद्याप क्लीनचिट नाही लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : पोर्नोग्राफी प्रकरणात गुन्हे शाखेने आतापर्यंत १२० पोर्न व्हिडीओ जप्त ...
शिल्पा शेट्टीला अद्याप क्लीनचिट नाही
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पोर्नोग्राफी प्रकरणात गुन्हे शाखेने आतापर्यंत १२० पोर्न व्हिडीओ जप्त केले आहेत. गुन्हे शाखेच्या हाती पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन (पीटीटी) लागले आहे. यात बॉलीफेमच्या माध्यमातून भविष्यात मिळणाऱ्या फायद्याविषयी उल्लेख करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
२०२१-२२ या वर्षात ३६ कोटी ५० लाख रुपयांचा ग्रॉस रेव्हेन्यू मिळून ४ कोटी ७६ लाख ८५ हजार रुपये निव्वळ फायदा होणार होता. तर, या वर्षात ३ लाख पौंड खर्च येणार असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. दुसरीकडे २०२२-२३ या वर्षात तब्बल ७३ कोटींचा ग्रॉस रेव्हेन्यू आणि यातून ३ लाख ६० हजार पौंड खर्चवजा करून पावणे पाच कोटीच्या जवळपास फायदा होणार होता. तर २०२३-२४ या वर्षात ग्रॉस रेव्हेन्यू हा १४ कोटी ६० लाख, नफा ३ कोटी ४२ लाख १ हजार ४०० रुपये आणि या वर्षात ४ लाख ३२ हजार पौंड खर्चाबाबत उल्लेख करण्यात आला आहे. ही कमाई नेमकी कोणत्या कंपनीची असणार आहे, याबाबतचा उल्लेख त्यात केलेला नाही. याबाबत गुन्हे शाखा अधिक तपास करत आहेत.
गुन्हे शाखेने आतापर्यंत १२० पोर्न व्हिडीओ जप्त केले आहेत. तसेच याप्रकरणात डिलीट केलेला तपशील पुन्हा मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे.
शिल्पा शेट्टीला क्लीनचिट नाही
कुंद्राच्या सहभागानंतर गुन्हे शाखेकड़ून अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्याही बँक खात्याची चौकशी करण्यास सुरुवात केली आहे. याप्रकरणात अद्याप तिला क्लीनचिट देण्यात आलेली नाही. तिचा यात सहभाग आहे का? याबाबत अधिक तपास सुरू आहे.