राणा दाम्पत्याविरोधात १२४ अ, राजद्रोहाचा गुन्हा, सरकारला आव्हान देणे, विरोधी वक्तव्य केल्याचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2022 02:07 PM2022-04-24T14:07:38+5:302022-04-24T14:08:28+5:30
Ravi Rana & Navneet Rana News: सरकारविरोधा वक्तव्य केल्याने तसेच आव्हान देण्याचा प्रयत्न केल्याने त्यांच्याविरोधात कलम १२४ अ, हे राजद्रोहाशी संबंधित कलम लावल्याची माहिती सरकारी वकील प्रदीप घरत यांनी दिली आहे.
मुंबई - मातोश्रीवर हनुमान चालिसा पठण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी रवी राणा आणि नवनीत राणा दाम्पत्याला कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आता त्यांच्या जामीन अर्जावर २९ एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. मात्र सरकारी वकील प्रदीप घरत यांनी दिलेल्या माहितीमुळे राणा दाम्पत्याच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. सरकारविरोधा वक्तव्य केल्याने तसेच आव्हान देण्याचा प्रयत्न केल्याने त्यांच्याविरोधात कलम १२४ अ, हे राजद्रोहाशी संबंधित कलम लावल्याची माहिती सरकारी वकील प्रदीप घरत यांनी दिली आहे.
याबाबत माहिती देताना सरकारी वकील प्रदीप घरत यांनी सांगितले की, रवी राणा आण नवनीत राणा यांनी वारंवार सूचना दिल्यानंतरही सरकारविरोधात विधाने केली होती. तसेच सरकारला आव्हान देण्यचा प्रयत्न केला होता. त्यामुळे राणा दाम्पत्यावर कलम १२४ अ अन्वये राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आले आहे. सरकारविरोधात प्रक्षोभक विधाने करणे आणि सरकारला आव्हान देणे यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे घरत यांनी सांगितले. राजद्रोहाचा गुन्हा हा अजामिनपात्र असून, त्याला जामीन मिळू शकत नाही.
दरम्यान, हनुमान चालिसा म्हणणे हा सरकारविरोधात प्रक्षोभक वक्तव्य असू शकत नाही. त्यामुळे हे आरोप बिनबुडाचे आणि आपल्या अशिलाला केसमध्ये अडकवण्याचे प्रयत्न असल्याचे राणा दाम्पत्याचे वकील मर्चंट यांनी सांगितले आहे. काल पोलिसांनी अटक केल्यानंतर राणा दाम्पत्याला आज कोर्टात हजर करण्यात आले होते. त्यानंतर कोर्टानेही दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून राणा दाम्पत्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.