सहार विमानतळ : कॅगच्या अहवालातील माहिती
मुंबई : अंधेरी (पूर्व) सहार येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नव्या टी-2 टर्मिनलच्या उभारणीसाठी येथे 2क्क्4 साली उभारण्यात आलेला शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा हलवण्यासाठी 125क् कोटी रुपये खर्च आल्याची माहिती कॅगच्या मार्च 2क्13 च्या अहवालात नमूद केली आहे. संसदेत पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या कारकिर्दीत 18 जुलै 2क्14 रोजी हा अहवाल सादर करण्यात आला.
या प्रकरणी मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप वॉच डॉग फाउंडेशनचे अध्यक्ष आणि माजी नगरसेवक निकोलस अल्मेडा यांनी केला आहे. या आर्थिक घोटाळ्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
शिवाजी महाराजांचे औलोकिक महत्त्व आहे. त्यांचा 2क्14 मध्ये बसवलेला पुतळा या विमानतळाच्या उभारणीसाठी खरे तर हजारो मुंबईकरांच्या उपस्थितीत आणि सहार ग्रामस्थांच्या उपस्थितीत वाजतगाजत हलवण्यात यायला हवा होता. मात्र मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्राधिकरणाने शिवाजी महाराजांचा पुतळा मध्यरात्री तीन वाजता गुपचूप हलवला, असा आरोप अल्मेडा यांनी केला. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या हलवण्याच्या कामाला उशीर झाल्यामुळे नव्या टी-2 टर्मिनलच्या उभारणीच्या कामाला तब्बल 17 महिन्यांनी उशिराने सुरुवात झाल्याची माहिती या अहवालात नमूद केली आहे. सध्या हा पुतळा या नव्या विमानतळापासून 2 किमी अंतरावरील सहार रोड, मरोळ पाइपलाइन येथील इम्पोर्ट वेयर हाऊसजवळ बसवण्यात आला आहे. मे 2क्क्6 मध्ये हा पुतळा मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्राधिकरणाकडे सुपुर्द केला असल्याचे या अहवालात नमूद केले आहे. (प्रतिनिधी)