Join us  

खुशखबर, हार्बर रेल्वे मार्गावर २९ एप्रिलपासून १२ डब्यांच्या लोकल धावणार

By admin | Published: April 27, 2016 5:10 PM

दररोराज लोकल मधील वाढणारी गर्दी आणि होणारे अपघात यामुळे रेल्वे प्रशासनाने हार्बर रेल्वेवर लोकलच्या डब्ब्यांची संख्या वाढवून १२ करण्यात येणार आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २७ - दररोराज लोकल मधील वाढणारी गर्दी आणि होणारे अपघात यामुळे रेल्वे प्रशासनाने हार्बर रेल्वेवर लोकलच्या डब्ब्यांची संख्या वाढवण्यात येणार आहे. २ बर्षापासून चालू असणारे काम पुर्ण झाले आहे.  २९ एप्रिल सध्या ज्या गाड्या ९ बोगीच्या आहेत त्या १२ बोगीच्या होणार आहेत. गर्दीमुळे धावत्या गाडीतून पडून होणाऱ्या मृत्यूंची दखल घेऊन रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. 
पनवेल, वाशी, बेलापूर या स्थानकांवरची गर्दी दिवसेंदिवस वाढत असून, या मार्गांवर अपघातांचे प्रमाणदेखील वाढले असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. पहिली बारा डबा लोकल त्वरीत सुरू केल्यानंतर काही दिवस ही एकच लोकल चालविण्यात येईल आणि त्यानंतर गाड्यांमध्ये वाढ करण्यात येणार आहे.
 
हार्बर मार्गावर १२ डबा लोकल चालविण्यासाठी फलाटांची लांबी वाढवण्यात आली आहे. सध्या हार्बरवर नऊ डब्यांच्या ३६ लोकल धावत असून त्यांच्या रोज एकूण ५९0 फेऱ्या होतात. ३६ लोकलला प्रत्येकी तीन डबे जोडल्यास प्रवासी क्षमता ३३ टक्क्यांनी वाढणार आहे, असे आश्वासन ओझा यांनी दिले आहे.
 
दरम्यान, ‘मानखुर्द ते पनवेलपर्यंत वेग वाढविण्याचे काम पावसाळ्यानंतर सुरू केले जाईल. काम पूर्ण झाल्यानंतर ट्रॅकची चाचणीही घेतली जाईल. सीएसटी ते मानखुर्दपर्यंतची स्थानके जवळजवळ असून मानखुर्द ते पनवेल दरम्यान दोन स्थानकांमधील अंतर जास्त आहे. सध्या हार्बरवरील लोकलचा वेग हा जास्तीत जास्त ताशी ६0 ते ७५ पर्यंत जातो. ट्रॅकचा वेग आणखी वाढल्यास हार्बरवरील लोकलचा वेगही वाढविण्यास मदत होईल.’या कामांमुळे मानखुर्द ते पनवेल टप्प्यात प्रत्येक स्थानकांदरम्यान ३0 ते ४0 सेकंदाचा वेळ वाचेल.