बारावी पेपरफुटी : कॉलेजच्या मालकाच्या मुलीसह प्राचार्य, दोन शिक्षक, ड्रायव्हर अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2023 11:36 AM2023-03-09T11:36:29+5:302023-03-09T11:36:55+5:30

नगरच्या ज्यु.कॉलेजचा निकाल १०० टक्के आणण्यासाठी फोडला पेपर

12th Paper leak Principal two teachers driver arrested along with daughter of college owner | बारावी पेपरफुटी : कॉलेजच्या मालकाच्या मुलीसह प्राचार्य, दोन शिक्षक, ड्रायव्हर अटकेत

बारावी पेपरफुटी : कॉलेजच्या मालकाच्या मुलीसह प्राचार्य, दोन शिक्षक, ड्रायव्हर अटकेत

googlenewsNext

मुंबई : बारावीच्या परीक्षेचा पेपर फोडल्याप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने अहमदनगर येथील एका ज्युनिअर कॉलेजच्या ५ जणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये कॉलेजचे प्राचार्य, कॉलेजच्या ट्रस्टीची मुलगी, पीटी शिक्षक, एका महिला शिक्षिकेसह चालकाचा समावेश असून, त्यांना घेऊन मुंबई गुन्हे शाखेचे पथक मुंबईला रवाना झाले आहे. कॉलेजचा निकाल १०० टक्के आणण्यासाठी आणि कमाईसाठी पेपर फोडण्यात आल्याचे समोर आले आहे. 

मुंबईतील शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात ४ मार्च रोजी इयत्ता १२ ची परीक्षा घेत असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयाने दाखल केलेल्या एफआयआरनुसार, परीक्षा हॉलमध्ये कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्याला पकडण्यात आले होते. ज्याच्या मोबाईल फोनमध्ये गणिताचा पेपर सापडला. परीक्षा सुरू होण्यापूर्वी हा पेपर त्या विद्यार्थ्याला २३ मिनिटे आधी पाठविण्यात आला होता. अधिवेशनात पेपरफुटीचे प्रकरण गाजले आणि या प्रकरणाचा तपास मुंबई क्राईम ब्रँचकडे सोपविण्यात आला होता. जॉइंट सीपी क्राईम लखमी गौतम याचे काम पाहात होते. या प्रकरणाच्या तपासात गुन्हे शाखेने अहमदनगर येथील मातोश्री भागुबाई भांबरे कृषी व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य भाऊसाहेब अमुर्ते (वय ५४), महाविद्यालयाचे शिक्षक किरण दिघे (२८), शिक्षक सचिन माहोर (२३), चालक वैभव तर्टे आणि कॉलेज मालकाची मुलगी अर्चना भाबरे (२३) यांना अटक करण्यात आली आहे.

सर्व आरोपी ३ मार्च रोजी बोर्डाच्या कार्यालयात पोहोचले आणि पेपर गोळा केल्यानंतर त्यांना २० किमी दूर परीक्षा केंद्रावर पोहोचायचे होते. परीक्षा केंद्रावर पेपर उघडायचा होता. मात्र परीक्षा केंद्रावर पोहोचण्यापूर्वीच या आरोपींनी पेपरचा गठ्ठा उघडला आणि आरोपी महिला शिक्षिका किरण दिघे हिने सकाळी ९.३० वाजता तिच्या मोबाईलवरून गणित बोर्डाच्या परीक्षेचे पेपर क्लिक केले. आपल्या १७ वर्षांच्या बहिणीला पाठवले. ज्या विद्यार्थ्यांकडून तिने बोर्डाच्या पेपरसाठी १०-१० हजार रुपये घेतले आहेत, त्यांना पेपर पाठवण्यास सांगितले.

व्हॉट्सॲपद्वारे पेपर लीक
महिला शिक्षिकेच्या १७ वर्षीय बहिणीने परीक्षेपूर्वी पेपर लीक करण्यासाठी अनेक विद्यार्थ्यांकडून १०-१० हजार रुपये आगाऊ घेतले होते. यासाठी एक व्हॉट्सॲप ग्रुप तयार करण्यात आला होता. परीक्षेच्या एक तास अगोदर साडेनऊ वाजता पेपर मिळताच त्यांनी हा पेपर या व्हॉट्सॲप ग्रुपद्वारे पैसे भरलेल्या विद्यार्थ्यांना ग्रुपमध्ये शेअर केला. पेपरसाठी पैसे दिलेल्यांपैकी एक विद्यार्थी दादर येथे बोर्डाच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्याचा नातेवाईक होता. त्याने अहमदनगरमध्ये लीक झालेला पेपर दादर येथील अल्पवयीन विद्यार्थ्याला पाठविला. दादर बोर्डाच्या केंद्राबाहेर उभ्या असलेल्या या अल्पवयीन विद्यार्थ्याने लगेचच हा पेपर इंजिनिअरिंग करत असलेल्या भावाला पाठवला. १०.१५ च्या सुमारास त्याच्या भावाने पेपर सोडवित दादरच्या विद्यार्थ्याला पाठविला आणि हाच सोडविलेला पेपर मोबाईलमधून कॉपी करताना पकडला गेला.

इतर विषयांचे पेपरही फोडल्याचा संशय
या प्रकरणात व्हॉट्सॲप चॅट्स, कॉल रेकॉर्ड आणि पेपर लीक या सर्व माहितीची छाननी करण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकरणात १७ वर्षीय मुलीचे म्हणणे नोंदविण्यात आले आहे. तिने व्हॉट्सॲपद्वारे पेपर फोडले होते. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. सध्या या अल्पव, तर इतर विषयांचे पेपरही अशाचप्रकारे फोडण्यात आले असावेत. यात शिक्षकांचाही समावेश असून, हे पेपर मोठया किमतीला विकण्यात आले असावेत. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

Web Title: 12th Paper leak Principal two teachers driver arrested along with daughter of college owner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.