धारावीत १२ व्या वेळा शून्य कोरोना रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:09 AM2021-08-18T04:09:17+5:302021-08-18T04:09:17+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई - कोरोनाचा प्रसार मुंबईत सुरू झाल्यानंतर पहिल्या आणि दुसऱ्या लाटेतही धारावी पॅटर्नने तग धरली आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई - कोरोनाचा प्रसार मुंबईत सुरू झाल्यानंतर पहिल्या आणि दुसऱ्या लाटेतही धारावी पॅटर्नने तग धरली आहे. यामुळे आतापर्यंत तब्बल १२ वेळा धारावीमध्ये शून्य बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. सध्या या भागात तेवढे सक्रिय रुग्ण आहेत.
मार्च २०२० मध्ये कोरोनाच्या पहिल्या लाटे दरम्यान धारावीतील रुग्णांची संख्या वाढली होती. दाटीवाटीची वस्ती असल्याने येथे कोरोनाचा प्रसार रोखण्याचे पालिकेपुढे आव्हान होते; मात्र धारावी पॅटर्नने संसर्गाची ही साखळी तोडली. जुलै २०२० नंतर या भागांमध्ये कोरोनाचा प्रसार पूर्णपणे नियंत्रणात आला.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान धारावीतील इमारतींमध्ये रुग्णांची संख्या वाढू लागली. त्यामुळे संसर्ग रोखण्यासाठी पालिकेने पुन्हा एकदा सर्वांची चाचणी सुरू केली बाधित रुग्णांच्या संपर्कातील लोकांचे विलगीकरण व तत्काळ उपचार सुरू करण्यात आले. या मोहिमेचा प्रभाव पुन्हा एकदा दिसून आला आहे. आतापर्यंत ६५९६ बाधित रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
* कोरोनाच्या पहिल्या लाटेत २२, २६, २७, ३१ जानेवारी आणि २ फेब्रुवारी रोजी धारावीत शून्य रुग्णांची नोंद झाली होती.
* दुसऱ्या लाटेत १४ जून, १७ जुलै आणि ८, ११ व १२ आणि आता १७ ऑगस्ट रोजी शून्य रुग्ण नोंदवले गेले आहेत.
जी उत्तर विभागातील आजची स्थिती...
परिसर...आजचे बाधित...एकूण रुग्ण...सक्रिय...डिस्चार्ज
धारावी...०.....६९९६....१०......६५९६
दादर....०६....९९५८...३३...९६४५
माहीम...०१...१०२६४...४३....९९७३