Join us  

छातीतून काढला १३ सेंमीचा ट्यूमर

By admin | Published: January 06, 2016 1:18 AM

छातीत दोन्ही बाजूला ट्यूमर असल्यामुळे गेल्या पाच वर्षांपासून टांझानियाचा नागरिक त्रस्त होता. दुर्मीळ आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णाला अनेक

मुंबई : छातीत दोन्ही बाजूला ट्यूमर असल्यामुळे गेल्या पाच वर्षांपासून टांझानियाचा नागरिक त्रस्त होता. दुर्मीळ आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णाला अनेक डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करायला नकार दिला होता. अखेर मुंबईच्या एका खासगी रुग्णालयात त्याच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली.टांझानियातील अवाध साड मब्रक (५१) यास पाच वर्षांपूर्वी पाठीचे दुखणे सुुरू झाले. त्याच्या पाठीला सूज येऊ लागली. हळूहळू त्रास वाढू लागला. डॉक्टरांकडे जाऊन तपासणी केल्यावर त्याच्या छातीत ट्यूमर असल्याचे आढळले. पण ट्यूमर छातीच्या सापळ्याला चिकटून असल्याने शस्त्रक्रिया करणे जिकिरीचे होते. अशा छातीत वाढणाऱ्या ट्यूमरला वैद्यकीय भाषेत ‘इलास्टोफाइब्रोमा डोरसी’ म्हणतात. ‘चेस्ट वॉल’ला चिकटून वाढणारा ट्यूमर हा अत्यंत दुर्मीळ आजार आहे. दोन्ही बाजूला ट्यूमर असल्यामुळे शस्त्रक्रिया करताना, फुप्फुसाला इजा होण्याचा धोका असतो. डिसेंबर महिन्यात अवाध रुग्णालयात आल्यावर त्याच्या सर्व तपासण्या करण्यात आल्यानंतर त्याला ‘इलास्टोफाइब्रोमा डोरसी’ झाल्याचे निदान करण्यात आले. त्याच्या डाव्या बाजूच्या छातीत १३ सेंमी आणि उजव्या बाजूला ३ सेंमीचा ट्यूमर होता. तीन तास शस्त्रक्रिया करून दोन्ही ट्यूमर काढण्यात आले. आता अवाधचे दुखणे कमी झाले असून तो सामान्यपणे हालचाली करू शकत असल्याचे डॉ. बजाज यांनी सांगितले.