१३ कोटींची रोकड ईडीकडून जप्त; १९६ कोटींच्या बँक घोटाळा प्रकरणात मुंबई, अहमदाबादमध्ये छापे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2024 05:51 IST2024-12-07T05:50:57+5:302024-12-07T05:51:25+5:30

मनी लाँड्रिंग झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर ईडीने तपास सुरू केला.

13 crore cash seized from ED 196 crore bank scam raids in Mumbai, Ahmedabad | १३ कोटींची रोकड ईडीकडून जप्त; १९६ कोटींच्या बँक घोटाळा प्रकरणात मुंबई, अहमदाबादमध्ये छापे

१३ कोटींची रोकड ईडीकडून जप्त; १९६ कोटींच्या बँक घोटाळा प्रकरणात मुंबई, अहमदाबादमध्ये छापे

मुंबई : नाशिक मर्चेंट को-ऑपरेटिव्ह बँकेत झालेल्या १९६ कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीने मुंबई व अहमदाबादमध्ये छापेमारी केली. यादरम्यान ईडीच्या अधिकाऱ्यांनी १३ कोटी ५० लाख रुपयांची रोख रक्कम जप्त केली. या प्रकरणात बेहसानिया वालिमोहद नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. 

गेल्या चार महिन्यांत बँकेतून १९६ कोटी रुपयांच्या ठेवी रोखीने काढण्यात आल्या. चहा विक्रेते आणि छोट्या १० ते १२ व्यावसायिकांच्या नावावरील खात्यांतून या ठेवी काढण्यात आल्यानंतर खातेदार सतर्क झाले. त्यांनी पोलिसांत तक्रार केली. मात्र, यामध्ये मनी लाँड्रिंग झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर ईडीने तपास सुरू केला.

 या घोटाळ्यामध्ये बँकेतील एक कर्मचारी सहभागी असून त्याने एमडी नावाने बनावट खाते बँकेत काढल्याचे तपासात निष्पन्न झाले. य प्रकरणी नोव्हेंबरमध्ये सैफ नावाच्य एका व्यक्तीला अटक करण्यात आल होती. त्याने १२५ कोटी रुपयांचा हवाल केल्याचा त्याच्यावर आरोप आहे.

Web Title: 13 crore cash seized from ED 196 crore bank scam raids in Mumbai, Ahmedabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.