व्यावसायिकाची १३ कोटींची फसवणूक, शेअर्सची परस्पर विक्री, पोलिसांचा तपास सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2023 12:42 PM2023-07-31T12:42:38+5:302023-07-31T12:42:54+5:30
डिसेंबर २०२० ते २८ जुलैदरम्यान ही फसवणूक करण्यात आली आहे. त्यानुसार, पोलिसांनी शनिवारी फसवणुकीचा गुन्हा नोंदवत अधिक तपास करत आहे. पुढील तपासासाठी हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.
मुंबई : गहाण ठेवलेल्या शेअर्सची परस्पर विक्री करत वयोवृद्ध व्यावसायिकाची तब्बल १३ कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी ना. म. जोशी मार्ग पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपासासाठी हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.
त्यांनी याबाबत संबंधितांना जाब विचारला; मात्र त्यांच्याकडून काहीही प्रतिसाद मिळाला नाही. चौकशीत व्यवहार झाले तेव्हा, अरोरा संबंधित कंपनीचा संचालक नसल्याचेही समोर आले. अखेर, यात फसवणूक झाल्याचे स्पष्ट होताच त्यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दिली.
डिसेंबर २०२० ते २८ जुलैदरम्यान ही फसवणूक करण्यात आली आहे. त्यानुसार, पोलिसांनी शनिवारी फसवणुकीचा गुन्हा नोंदवत अधिक तपास करत आहे. पुढील तपासासाठी हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.
विश्वासाला तडा
लोअर परळ येथील रहिवासी असलेले व्यावसायिक आदित्य शूरजी (वय ७३) यांच्या तक्रारीनुसार, कोरोनाकाळात कर्जाची आवश्यकता असल्याने त्यांची अर्जेंट फिनवेस्ट प्रा. लिमिटेडचे रोहित अरोरा यांच्यासोबत ओळख झाली. त्यांनी शेअर्स गहाण ठेवून कर्ज देण्याचे आमिष दाखवले. यामध्ये रोहित अरोरासह अंबे सिक्युरिटीज लि. कंपनीचे संचालक अनुपम गुप्ता व अभय गुप्ता यांनी शेअर्स गहाण ठेवण्यास भाग पाडून त्यांना ३ कोटी १० लाखांचे कर्ज मिळवून दिले. पुढे, संबंधित कंपनीच्या संचालकांनी तक्रारदार यांचे विश्वासाने गहाण ठेवलेले शेअर्स हे त्यांच्या परवानगीशिवाय परस्पर विक्री केल्याचे समजताच त्यांना धक्का बसला.