Join us

विनातिकीट प्रवाशांकडून १३ कोटींची दंडवसुली

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2019 6:14 AM

पश्चिम रेल्वे प्रशासनाची मार्च महिन्यातील कारवाई; मागील वर्षीपेक्षा यंदा दंडाच्या रकमेत ४९.८७ टक्क्यांनी वाढ

मुंबई : पश्चिम रेल्वे प्रशासनाची विनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर करडी नजर असते. त्यांच्यावर कारवाईसाठी अनेक मोहिमा आणि अभियान राबविण्यात येत आहे. याद्वारे मार्च महिन्यात पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागातून विनातिकीट प्रवास करणाºया प्रवाशांकडून तब्बल १३ कोटी ४६ लाखांचा दंड वसूल केला आहे.पश्चिम रेल्वे मार्गावरील सर्व स्थानकांतील विनातिकीट प्रवास करणाºया प्रवाशांवर कारवाई करण्यात पश्चिम रेल्वे प्रशासनाला यश आले आहे. मार्च महिन्यात एकूण २ लाख ४५ हजार प्रकरणे नोंद करण्यात आली. यातून १३ कोटी ४६ लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे. विनातिकीट प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाल्याने मागील वर्षीपेक्षा या वर्षी दंडाच्या रकमेत ४९.८७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. विनातिकीट प्रवाशांना पकडण्यासह रेल्वे प्रशासनाने रेल्वे परिसरातील ३२९ गर्दुल्ले आणि ६३१ अनधिकृत फेरीवाल्यांना परिसरातून बाहेर काढले आहे. दंडाची रक्कम न भरणाºया २५८ जणांना तुरुंगात पाठविण्यात आले आहे.मार्च महिन्यात २५२ तिकीट दलालांविरोधात चौकशी करण्यात आली. यामधील १४४ जणांना पकडण्यात आले असून त्यांच्याकडून रेल्वे कायद्यानुसार दंड वसूल करण्यात आला आहे. महिला डब्यातून प्रवास करणाºया १२ वर्षे तसेच त्यापुढील वर्षांच्या मुलांना पकडण्यासाठी सुरक्षिणी पथक तैनात करण्यात आले आहे. अशा ६१ मुलांना मार्च महिन्यात ताब्यात घेण्यात आले आहे.दरम्यान, पश्चिम रेल्वे प्रशासनाद्वारे विनातिकीट प्रवाशांवर कारवाईसाठी विविध अभियान राबविण्यात येत आहेत. या कारवाईअंतर्गत रेल्वे नियम मोडणाºया प्रवाशांना ताब्यात घेण्यात येत आहे. त्यांच्याकडून दंडाची रक्कम वसूल करण्यात येते. वसूल करण्ययात आलेल्या या दंडाच्या रकमेचा वापर रेल्वेचे नियम पाळणाºया प्रवाशांना पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी केला जातो, असे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी सांगितले.फेब्रुवारी महिन्यात ९० जणांना कोठडीपश्चिम रेल्वे प्रशासनाकडून फेब्रुवारी महिन्यात ११ कोटी १५ लाखांचा दंड वसूल करून महसूल जमा करण्यात आला. या महिन्यात एकूण २ लाख ३६ हजार प्रकरणे नोंदविण्यात आली होती. पश्चिम रेल्वे मार्गावरील रेल्वे परिसरातून ३१८ गर्दुल्ले आणि ४२८ अनधिकृत फेरीवाल्यांना रेल्वे परिसरातून बाहेर काढून त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात आला आहे, तर दंडाची रक्कम न भरणाºया ९० जणांना कोठडी सुनावली आहे.

टॅग्स :पश्चिम रेल्वे