Join us

हँडबॅगेत तिने लपवले होते १३ कोटींचे कोकेन; विमानतळावर परदेशी महिलेला अटक, डीआरआयची कारवाई

By मनोज गडनीस | Published: December 21, 2023 8:10 PM

अदिस अबाबा येथून मुंबईत दाखल झालेल्या एका परदेशी महिलेकडून तब्बल १३ कोटी रुपयांचे कोकेन जप्त करण्यात आले आहे.

मुंबई - अदिस अबाबा येथून मुंबईत दाखल झालेल्या एका परदेशी महिलेकडून तब्बल १३ कोटी रुपयांचे कोकेन जप्त करण्यात आले आहे. केंद्रीय महसूल गुप्तचर यंत्रणेच्या (डीआरआय) अधिकाऱ्यांनी गुरुवारी ही कारवाई केली. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अदिस अबाबा येथून ईटी-६४० या विमानातून येणाऱ्या महिला प्रवाशाकडून अंमली पदार्थांची तस्करी होणार असल्याची विशिष्ट माहिती डीआरआयच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती.

हे विमान मुंबईत दाखल झाल्यानंतर एका महिलेच्या संशयास्पद हालचाली वाटल्यामुळे अधिकाऱ्यांनी तिची चौकशी केली. त्या दरम्यान तिच्या सामानाची झडती घेतली असता तिच्या हँडबॅगेमध्ये १२७३ ग्रॅम कोकेन असल्याचे आढळून आले. या कोकेनची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत १३ कोटी रुपये इतकी आहे. तिला अटक करून न्यायालयात हजर केले असता तिला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

टॅग्स :मुंबईगुन्हेगारी