Join us

मरिनड्राइव्ह येथील चेंगराचेंगरीत १३ जखमी

By संतोष आंधळे | Published: July 05, 2024 8:07 PM

एका रुग्णाला अधिक उपचारासाठी रुग्णालयातच दाखल करून ठेवण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : टी २० विश्वचषक जिंकून आलेल्या भारतीय संघाच्या स्वागतासाठी वानखडे स्टेडियम परिसरात गुरुवारी चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली होती. त्या दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरी १३ नागरिक जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी जी टी, सेंट जॉर्जेस आणि बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यापैकी ११ रुग्णांना जी टी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून १० रुग्णांनी उपचार घेऊन घरी निघून गेले. तर एका रुग्णाला अधिक उपचारासाठी रुग्णालयातच दाखल करून ठेवण्यात आले आहे.

सेंट जॉर्जेस आणि बॉम्बे रुग्णालयात सुद्धा प्रत्येकी एका रुग्णाला उपचार देऊन घरी सोडण्यात आले आहे. हे सर्व रुग्ण मरिनड्राइव्ह आणि वानखेडे परिसरातील आहे. यामध्ये काही रुग्णांना श्वास घेण्याच्या तक्रारी, चेंगराचेंगरी एकमेकांच्या पायावर पाय दिल्यामुळे झालेल्या जखमा झाल्यामुळे रुग्णालयात गुरुवारी रात्री उशिरा दाखल करण्यात आले होते. सर्व रुग्णांना रुग्णालयात पोचताच उपचार देण्यात आले. अनेक रुग्णांनी उपचार घेतल्यामुळे बरे वाटले म्हणून डिस्चार्ज घेऊन घरी गेल्याचे जीटी रुग्णालयाच्या डॉक्टरांनी सांगितले आहे.

५० वर्षीय प्रकाश परमार या रुग्णाला डाव्या पायाला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्याला सर्जन डॉ मुकुंद तायडे याच्या युनिट मध्ये वॉर्ड क्रमांक ५ याठिकाणी उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या सर्व नागरिकांना वानखेडे स्टेडियमवरून जी टी रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले होते. उपचार घेऊन घरी सोडण्यत आले.

आदित्य राणे - २० - कमरेत वेदनाअमर पवार - ३२- श्वास घेण्यास त्रासहरिओम पांडे - २३ - चेंगराचेंगरी मुळे झालेली दुखापतरणजित श्याम -३०- गुडघ्याला दुखापतजय जांभळे - १४ - श्वास घेण्यास त्रासरिषभ जाधव - १९ - श्वास घेण्यास त्रासप्रज्वल राजपुत -२५ - अंगठ्याला दुखापततपन पटवा - 22- दुखापतीमुळे मांडीवर सूजआयुष घरत -18 - चेंगराचेंगरी मुळे झालेली दुखापतउद्धव दास - 23 - चेंगराचेंगरी मुळे झालेली दुखापत

टॅग्स :मुंबई