मुंबई विमानतळावर पकडले १३ किलो सोने, इलेक्ट्रॉनिक वस्तू- सीमा शुल्क विभागाची कारवाई
By मनोज गडनीस | Published: July 17, 2024 06:38 PM2024-07-17T18:38:45+5:302024-07-17T18:39:15+5:30
Mumbai Crime News: गेल्या १० ते १४ जुलै या दरम्यान मुंबई विमानतळावरील सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी एकूण २४ प्रकरणांमध्ये १३ किलो २४ ग्रॅम सोन्यासह काही इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या तस्करीचा पर्दाफाश केला आहे.
- मनोज गडनीस
मुंबई - गेल्या १० ते १४ जुलै या दरम्यान मुंबईविमानतळावरील सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी एकूण २४ प्रकरणांमध्ये १३ किलो २४ ग्रॅम सोन्यासह काही इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या तस्करीचा पर्दाफाश केला आहे. या मुद्देमालाची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत १० कोटी ३३ लाख रुपये इतकी आहे. या प्रकरणी एकूण सात जणांना अटक करण्यात आली आहे.
सोन्याचे दागिने, सोन्याचे बार, सोन्याची पावडर, सोन्याची पेस्ट आदी प्रकारांतून सोने मुंबईत आणण्यात आले होते. यापैकी एका प्रकरणातील सोने हे विमानातील प्रसाधनगृहात ठेवल्याचे अधिकाऱ्यांना आढळून आले. हे सोने प्रामुख्याने दुबई, अबुधाबी, जेद्दा येथून आले होते. या खेरीज अबुधाबी, दुबई, बाहरिन, शारजा येथून आलेल्या १६ प्रवाशांच्या बॅगेतून २ कोटी १६ लाख रुपये किमतीच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. बॅगेतील कपड्यांच्या आत या वस्तू लपविण्यात आल्या होत्या. तर, याचसोबत मुंबईतून बँकॉकला जाणाऱ्या दोन परदेशी प्रवाशांच्या बॅगेतून ४५ लाख रुपये मूल्याचे परकीय चलन देखील जप्त करण्यात आले आहे.