मुंबई : मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिक मागास वर्गांतर्गत (एसईबीसी) शासकीय नोकऱ्यांमध्ये १३ टक्के आरक्षण देण्याबाबतचा शासकीय आदेश आज जारी करण्यात आला. शासनाने आधी १६ टक्के आरक्षण दिले होते. मात्र, उच्च न्यायालयाने नोक-यांमध्ये १३ टक्के तर शिक्षणामध्ये १२ टक्के आरक्षणाचा निर्णय दिल्यानंतर आज नोक-यांमधील आरक्षणाबाबतचा सुधारित आदेश काढला.हा निर्णय शासकीय, निमशासकीय कार्यालये, सेवामंडळे, महापालिका, नगरपालिका, शैक्षणिक संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषदा, महामंडळे, शासकीय अनुदान प्राप्त संस्था, विद्यापीठे, सहकारी संस्था, शासकीय उपक्रम व शासनाच्या अधिपत्याखालील किंवा शासनाने अनुदान दिलेली मंडळे आदींना लागू राहील.
मराठा समाजाला नोकऱ्यांत १३ टक्के आरक्षण, आदेश जारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2019 3:54 AM