बालनाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत १३ नाटके

By admin | Published: December 28, 2015 03:37 AM2015-12-28T03:37:10+5:302015-12-28T03:37:10+5:30

राज्यभरात सादर झालेल्या २१६ नाटकांमधून प्रभादेवीच्या रवींद्र नाट्यमंदिर अंतिम फेरीत १३ नाटके सादर होतील. सांस्कृतिक कार्य संचालनालय

13 plays in the final of the Balatanti tournament | बालनाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत १३ नाटके

बालनाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत १३ नाटके

Next

मुंबई : राज्यभरात सादर झालेल्या २१६ नाटकांमधून प्रभादेवीच्या रवींद्र नाट्यमंदिर अंतिम फेरीत १३ नाटके सादर होतील. सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई आयोजित १३ वी महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धा २८ ते ३० डिसेंबर दरम्यान मुंबईत पार पडणार आहे.
२८ डिसेंबर रोजी वैष्णवी महिला व आदिवासी वि.सं. अमरावतीचे ‘तमसो मां ज्योतिर्गमय’, सप्तरंग थिएटर्स,अहमदनगरचे ‘सर तुम्ही गुरुजी व्हा’, संस्कार विद्यालय, बीडचे ‘राखेतून उडाला मोर’, गंधर्व बहुउद्देशीय संस्था, अमरावतीचे ‘शेवटचे स्पंदन’ तर २९ डिसेंबर रोजी सस्नेह कला, क्रीडा,सांस्कृतिक मंडळ, सांगलीचे ‘एका झाडाची गोष्ट’, सनी कलामंच. बीडचे ‘कस्तुरी’, प्रबोधिनी विद्यामंदिर, नाशिकचे ‘शहाणपण देगा देवा’, जीवन विकास प्रतिष्ठान, लातूरचे ‘कथा एका जिद्दीची’ आणि महाराष्ट्र सेवा संघ, मुंबईचे ‘तुफानातील मोती’ सादर होणार आहे, तसेच ३० डिसें. रोजी ज्ञानदीप कलामंच, ठाणेचे ‘डरांव.. डरांव’, ब्राम्हणी शिक्षण प्रसारक मंडळ, नागपूरचे ‘बंद गली’, अहिल्यादेवी कन्या विद्यालय, भुसावळचे ‘वीज पेरूया अंगात’ आणि अभिनव विद्यालय, पुणेचे ‘गोष्ट पृथ्वी मोलाची’ ही नाटके सादर होतील. या सर्व नाटकांसाठी प्रवेश विनामूल्य असून, त्याचा शालेय विद्यार्थी, पालक आणि नाट्यरसिकांनी
याचा लाभ घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाने केले आहे.

Web Title: 13 plays in the final of the Balatanti tournament

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.