मुंबई : वीज बिल भरणा केंद्रांमध्ये बेस्ट उपक्रमाद्वारे १३० अतिरिक्त वीजबिल भरणा केंद्रांचा समावेश करण्यात आला आहे. अतिरिक्त केंद्रांमुळे वीज ग्राहकांना स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ८८ शाखांमधून तसेच इतर बँकांच्या ४२ भारत बिल पेमेंट सिस्टीममार्फत वीजबिल स्वीकारणाऱ्या बँक केंद्राद्वारे वीजबिल भरण्याची सेवा उपलब्ध होईल. वीज ग्राहक जवळच्या केंद्रांमध्ये रोखीने, धनादेशाद्वारे, ऑनलाईन पद्धतीने वीजबिल भरू शकतात. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखांमधून वीजबिल भरतेवेळी वीज ग्राहकांना त्यांचा दहा अंकी ग्राहक क्रमांक बेस्ट ईबी या उपसर्गासोबत नमूद करावा लागेल. ही सुविधा १० सप्टेंबरपासून उपलब्ध होईल. यामुळे वीज ग्राहकांना वीजबिल भरण्यासाठी रांग लावावी लागणार नाही. वीजबिल भरणा केंद्राच्या यादी बेस्टच्या संकेतस्थळावर आणि समाज माध्यमांवरही उपलब्ध होईल.
१३० अतिरिक्त वीज भरणा केंद्रे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2021 4:06 AM