मुंबई : ‘जनमुक्ती मोर्चा’ या स्वयंसेवी संस्थेतर्फे कांजूरमार्ग येथील सरस्वती विद्यालयातील १३0 गरजू विद्यार्थी दत्तक घेण्यात आले. या विद्यार्थ्यांच्या दहावीपर्यंतच्या शिक्षणाचा खर्च संस्थेतर्फे करण्यात येणार असल्याचे राष्ट्रीय अध्यक्ष मानव जोशी यांनी जाहीर केले.शुक्रवारी शाळेच्या सभागृहात समारंभपूर्वक हा उपक्रम पार पडला. दातृत्व दाखविणाºया समाजातील अशा व्यक्ती आणि संघटनांमुळे मानवता अजून कायम असल्याचा विश्वास वाढीस लागतो. गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक वाटचालीत या मदतीमुळे मोठा दिलासा मिळतो, असे सरस्वती विद्यालयाचे अध्यक्ष बाबा कदम यांनी सांगितले.या वेळी विद्यार्थ्यांना गणवेश, तसेच शालेपयोगी वस्तूंचे वाटपही करण्यात आले. जनमुक्ती मोर्चातर्फे दिल्ली, हरियाणा, कोलकाता आणि जम्मू काश्मीर येथेही शैक्षणिक उपक्रम सुरू आहेत.या कार्यक्रमाला रितू जोशी, आदिती जोशी, आदित्यविक्रम जोशी, सुखविंदर सिंग, जसपाल कौर, स्वरणसिंग मथारू, संजय विजन, सरस्वती विद्यालयाचे सचिव विजय तोडणकर, जगन्नाथ चिंचकर, माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका पद्मा जोशी, सुचित्रा रावराणे, पूनम मयेकर आदी उपस्थित होते.
‘जनमुक्ती मोर्चा’तर्फे १३0 विद्यार्थी दत्तक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2017 3:11 AM