जहाजावरील १३१ जणांना १५ दिवस समुद्रात मुक्काम करावा लागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2020 02:42 AM2020-03-18T02:42:36+5:302020-03-18T02:43:09+5:30

अमेरिकेच्या सॅनफ्रान्सिस्कोच्या समुद्रात जहाजावर अडकलेल्या १३१ कर्मचाऱ्यांचे भारतात येण्याचे प्रयत्न फसले असून अजून किमान १५ दिवस तरी त्यांना समुद्रातच मुक्काम करावा लागणार आहे

The 131 people on the ship will have to stay in the sea for 15 days | जहाजावरील १३१ जणांना १५ दिवस समुद्रात मुक्काम करावा लागणार

जहाजावरील १३१ जणांना १५ दिवस समुद्रात मुक्काम करावा लागणार

Next

 - मनोहर कुंभेजकर
मुंबई : अमेरिकेच्या सॅनफ्रान्सिस्कोच्या समुद्रात जहाजावर अडकलेल्या १३१ कर्मचाऱ्यांचे भारतात येण्याचे प्रयत्न फसले असून अजून किमान १५ दिवस तरी त्यांना समुद्रातच मुक्काम करावा लागणार आहे. त्या जहाजाच्या कॅप्टनने या १३१ खलाशांच्या वैद्यकीय चाचणीचे पैसे जर वेळीच गेल्या रविवारी सॅनफ्रान्सिस्को आंतरराष्ट्रीय विमानतळावर भरले असते तर आम्ही सर्व खलाशी आज भारतात आमच्या देशात व आमच्या कुटुंबीयांबरोबर असतो, अशी प्रतिक्रिया खलाशी एडलर रोड्रिंक्स यांनी दिली.
यासंदर्भात खलाशांनी आपली व्यथा केंद्रीय परराष्ट्रमंत्री जयशंकर यांच्याकडे मांडून आमची लवकर सुटका करून आम्हाला मायदेशात घेऊन या, असे म्हटले आहे. वसई येथील एडलर रोड्रिंक्सची पत्नी बियांका यांनी वॉचडॉग फाउंडेशनचे गॉडफ्रे पिमेंटा आणि निकोलस अलमेडा यांना यासंदर्भात माहिती दिली आहे.
१३१ जणांना परत आणण्यासाठी एक पत्र विदेश मंत्रालयाला पाठविण्यात आले आहे. या सर्व खलाशांना वैद्यकीय सेवा मिळून त्यांना कोरोनाची लागण होणार नाही याकडे केंद्र सरकारने लक्ष दिले पाहिजे, असे फाउंडेशनचे म्हणणे आहे.

Web Title: The 131 people on the ship will have to stay in the sea for 15 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.