Join us

२०२३ मध्ये देशात १३३ नवी विमाने ताफ्यात; एक वर्षात ताफ्यात पहिल्यांदाच एवढी विमाने दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 06, 2024 12:50 PM

यापूर्वी २०२२ मध्ये एका वर्षामध्ये भारतीय विमान कंपन्यांच्या ताफ्यात ८८ नवीन विमाने दाखल झाली होती. त्या तुलनेत २०२३ मध्ये झालेली ही वाढ ५१ टक्के अधिक आहे.

मुंबई : नुकत्याच सरलेल्या वर्षामध्ये भारतीय हवाई क्षेत्राने प्रवासी संख्येचा उच्चांक गाठला असतानाच दुसरीकडे भारतीय विमान कंपन्यांच्या ताफ्यात एकूण १३३ नवीन विमाने दाखल झाली आहेत. एका वर्षात १०० पेक्षा जास्त विमाने दाखल होण्याचा हा उच्चांक ठरला आहे. यापूर्वी २०२२ मध्ये एका वर्षामध्ये भारतीय विमान कंपन्यांच्या ताफ्यात ८८ नवीन विमाने दाखल झाली होती. त्या तुलनेत २०२३ मध्ये झालेली ही वाढ ५१ टक्के अधिक आहे. 

नागरी विमान महासंचालनालयाने (डीजीसीए) ही माहिती दिली आहे. गेल्या वर्षी भारतीय विमान कंपन्यांनी स्वत:ची एकूण ११२ विमान खरेदी केली आहेत. तर २१ विमाने भाडेतत्त्वावर घेतली आहेत. अशा पद्धतीने एकूण १३३ विमाने सेवेत रुजू झाली आहेत. भारतीय विमान कंपन्यांमधील प्रमुख कंपनी असलेल्या इंडिगो आणि एअर इंडियाने मिळून गेल्यावर्षी एकूण ९७० विमानांच्या खरेदीची ऑर्डर दिली आहे. त्यामुळे २०२४ च्या वर्षी २०२३ चा विक्रम मोडला जाण्याची शक्यता आहे. 

विमान कंपन्यांची संख्या १६ वर- डीजीसीएने दिलेल्या आणखी एका आकडेवारीनुसार देशातील विमान कंपन्यांच्या संख्येत देखील वाढ झाली असून २०२३ मध्ये भारतीय विमान कंपन्यांची एकूण संख्या १६ वर पोहोचली आहे तर त्यांच्या ताफ्यातील एकूण विमानांची संख्या ७७१ इतकी झाली आहे.- एकीकडे नवीन १३३ विमाने दाखल झाली असली तरी गो-फर्स्ट आणि इंडिगोची १०० विमानेदेखील गेल्यावर्षी तांत्रिक कारणांमुळे जमिनीवर स्थिरावली आहेत. - मात्र, ही नवीन १३३ विमाने दाखल झाल्यामुळे विमान सेवेच्या कामकाजावर फारसा परिणाम झाला नसल्याचे मत हवाई क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. 

टॅग्स :विमानविमानतळ