Join us

दुसऱ्या फेरीसाठी १,३३,२४५ जागा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2019 4:58 AM

अकरावी प्रवेशासाठीच्या पहिल्या गुणवत्ता यादीने नव्वदी पार केल्यानंतर आता विद्यार्थी, पालकांचे लक्ष दुस-या गुणवत्ता यादीकडे लागले आहे.

मुंबई : अकरावी प्रवेशासाठीच्या पहिल्या गुणवत्ता यादीने नव्वदी पार केल्यानंतर आता विद्यार्थी, पालकांचे लक्ष दुस-या गुणवत्ता यादीकडे लागले आहे. दरम्यान, २२ जुलै रोजी जाहीर होणाºया दुसºया गुणवत्ता यादीसाठी आॅनलाइन प्रवेशाच्या एकूण १ लाख ३३ हजार २४५ जागा उपलब्ध आहेत.उपलब्ध जागांपैकी कला शाखेसाठी १६ हजार ७१०, वाणिज्य शाखेसाठी ७२ हजार ४९२, विज्ञान शाखेसाठी ४१ हजार १७४ तर एचएसव्हीसीसाठी २,८६९ जागा आहेत. पहिल्या फेरीत अलॉट १ लाख ३४ हजार ४६७ जागांपैकी ७२ हजार ३६१ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केल्यानंतरची जागांची स्थिती उपसंचालक कार्यालयाकडून संकेतस्थळावर विद्यार्थ्यांसाठी जाहीर करण्यात आली आहे. या माहितीच्या आधारे दुसºया गुणवत्ता यादीसाठी विद्यार्थ्यांना अर्जाचा भाग १ आणि भाग २ दुरुस्ती करायची असल्यास तसेच पसंतीक्रम बदलण्यासाठी गुरुवार, १८ जुलै रोजी शेवटची संधी असेल.अकरावी आॅनलाइन प्रवेशाच्या दुसºया गुणवत्ता यादीसाठी कोट्याच्या जागाही मुंबई उपसंचालक विभागाने जाहीर केल्या आहेत.दुसºया गुणवत्ता यादीसाठी अल्पसंख्याक महाविद्यालयांत एकूण २० हजार ९६९, व्यवस्थापन कोट्यासाठी ४,६८१ तर इनहाउस कोट्याच्या ३,५९० जागा उपलब्ध आहेत. अकरावी आॅनलाइन प्रवेशाच्या सुरुवातीला कोट्याच्या जागा जाहीर करण्यात न आल्याने आतापर्यंत कोट्याच्या जागांतून किती प्रवेश झाले, हे स्पष्ट झालेले नाही.>विद्यार्थ्यांना प्रतीक्षा पसंतीच्या महाविद्यालयाचीअकरावी आॅनलाइनच्या पहिल्या यादीत मुंबई विभागातून तब्ब्ल ७२ हजार ३६१ विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात प्रवेश मिळूनही ते निश्चित केले नाहीत. त्यामुळे अनेक विद्यार्थी आपल्याला दुसºया गुणवत्ता यादीत तरी पसंतीचे महाविद्यालय मिळेल अशा प्रतीक्षेत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे दुसºया गुणवत्ता यादीत उपलब्ध १ लाख ३३ हजार २४५ जागांवर किती विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.>शाखा उपलब्ध जागाकला १६,७१०वाणिज्य ७२,४९२विज्ञान ४१,१७४एकूण १,३३,२४५>कोट्याच्या उपलब्ध जागाकोटा - उपलब्ध जागाअल्पसंख्याक - २०,९६९इनहाउस - ३,५९०व्यवस्थापन - ४,६८१