राज्यात आधारभूत किमतीने तूर खरेदीसाठी १३४ खरेदी केंद्र सुरू- सुभाष देशमुख

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2019 02:39 PM2019-02-06T14:39:23+5:302019-02-06T14:55:54+5:30

केंद्र शासनाने यावर्षी तुरीची आधारभूत किंमत क्विंटल मागे 5 हजार 675 रुपये इतकी निश्चित केली आहे.

134 purchasing centers for the purchase of ture with state of the art prices started- Subhash Deshmukh | राज्यात आधारभूत किमतीने तूर खरेदीसाठी १३४ खरेदी केंद्र सुरू- सुभाष देशमुख

राज्यात आधारभूत किमतीने तूर खरेदीसाठी १३४ खरेदी केंद्र सुरू- सुभाष देशमुख

googlenewsNext

मुंबई : केंद्र शासनाने यावर्षी तुरीची आधारभूत किंमत क्विंटल मागे 5 हजार 675 रुपये इतकी निश्चित केली आहे. राज्यात आधारभूत किंमतीने तूर खरेदीसाठी आतापर्यंत १३४ खरेदी केंद्र सुरू करण्यात आली आहेत. या केंद्रावर आतापर्यंत १७ हजार २६४ शेतकऱ्यांनी तूर खरेदीसाठी नोंदणी केली आहे. तसेच काही खरेदी केंद्र सुरू करण्याचे प्रस्तावित आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आधारभूत किमतीपेक्षा कमी दरात व्यापाऱ्यांना तूर विक्री करू नये, असे आवाहन पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी केले.

या वर्षी राज्यातील तुरीचे उत्पादन कमी प्रमाणात आहे. ज्या भागात तुरीचे उत्पादन जास्त आहे आणि खरेदी केंद्र सुरू करावे, अशी शेतकऱ्यांची मागणी असेल त्या भागात सुद्धा खरेदी केंद्र सुरू करण्याचे प्रस्तावित आहे. शेतकऱ्यांनी आधारभूत किमतीपेक्षा कमी दराने व्यापाऱ्यांना तूर विक्री करू नये आणि ही विक्री करीत असताना शेतकऱ्यांनी आपला 7/12 उतारा व्यापाऱ्यांना देऊ नये, जर आधारभूत किमतीपेक्षा कमी दराने व्यापारी तूर खरेदी करत असतील तर अशा व्यापाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. असेही देशमुख यांनी सांगितले.

Web Title: 134 purchasing centers for the purchase of ture with state of the art prices started- Subhash Deshmukh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.