मुंबई : उद्योग विभागाने लॉकडाउननंतर काही अटी व शर्थीसह उद्योग सुरू करण्यासाठी परवाने जारी केले आहेत. २० ते २७ एप्रिल दरम्यान १३ हजार ४४८ उद्योगांना परवाने जारी केल्याचे उद्योग विभागाने कळविले आहे. केंद्र शासनाने २० एप्रिलपासून लॉकडाउन काही प्रमाणात शिथिल केले व काही अटी शर्थीवर उद्योग सुरू करण्यासाठी परवानी दिली आहे.केंद्राच्या मार्गदर्शक सूचना डोळ्यासमोर ठेवून उद्योग विभागाने उद्योग सुरू करण्यासाठी ऑनलाइन प्रक्रिया राबविली आहे. परवाने मिळवण्यासाठी आतापर्यंत २५ हजार अर्ज दाखल झाले असून अटी व शथीर्चे पालन करणाऱ्या सुमारे १३ हजार ४४८ उद्योगांना परवाने देण्यात आले आहेत.उद्योग सुरू करताना सामाजिक अंतर राखणे, कामगारांची कंपनी किंवा कारखान्याच्या आवारात राहण्याची सोय करणे, कामगारांचे दळणवळण टाळणे आदी सूचनांचे पालन करणाऱ्यांनाच परवाने दिले जात आहेत.वरील सूचनांचे पालन करण्याची तयारी असलेल्या उद्योगांना आतापर्यंत परवानगी दिली जात आहे. परंतु मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली, पनवेल, यासह बारा महानगरपालिका क्षेत्रात जिथे रेड झोन आहे, त्या ठिकाणी अद्याप उद्योग सुरू करण्यास परवानगी दिलेली नाही. उद्योग सुरू होणे काळाजी गरज आहे. यामुळे उद्योगचक्राला गती मिळेल, शिवाय कामगारांना रोजगार मिळेल, असा आशावाद उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सोमवारी घेतलेल्या आढावा बैठकीत व्यक्त केला.
लॉकडाऊन शिथिल झाल्यावर १३,४४८ उद्योगांना परवाने
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2020 5:04 AM