Join us

मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेत यंदा १३४५ कोटींची कपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 4:08 AM

सरकारने केली अवघी ३७२ कोटींची तरतूदलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेसाठी करण्यात येणाऱ्या तरतुदीमध्ये सातत्याने कपात ...

सरकारने केली अवघी ३७२ कोटींची तरतूद

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेसाठी करण्यात येणाऱ्या तरतुदीमध्ये सातत्याने कपात नोंदवण्यात येत आहे. मागील वर्षी केंद्र सरकाराने यासाठी १७१७ कोटी रुपयांची तरतूद केली होती. मात्र यंदा ही तरतूद ३७२ कोटींवर घसरली असून, यातून केवळ १५६४५३ विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीचा लाभ होऊ शकल्याची माहिती माहितीच्या अधिकारातून उघड झाली आहे. यावरून यंदा तरतुदीमध्ये १३४५ कोटींची कपात करण्यात आली आहे.

राज्य शासनामार्फत उच्च शिक्षण संचालनालयाच्या माध्यमातून विद्यापीठ, महाविद्यालयातून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आर्थिक मदत म्हणून विविध १४ शिष्यवृत्ती योजना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मात्र दरवर्षी लाखो विद्यार्थी अर्ज करूनही या शिष्यवृत्तीपासून वंचित राहत असल्याची माहिती अधिकारातून पुढे आली आहे. मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनाही त्याचाच एक भाग आहे. २०१५-१६ या शैक्षणिक वर्षात या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही ५ लाख ७९ हजार २७४ इतकी होती. २०२०-२१ या वर्षात ती थेट १ लाख ९ हजारावर आली आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षाची प्रक्रिया अद्याप सुरू झाली असली तरी या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत सातत्याने घट होत आहे. लाभार्थींच्या संख्येतील ४ लाखांहून अधिकची घट ही उच्च शिक्षणाकडे वळू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येतील गळतीचे द्योतक असू शकते, अशी भीती तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

त्वरित कारवाईची मागणी

शिष्यवृत्ती योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात उच्च शिक्षण विभाग अपयशी ठरत आहे. शिष्यवृत्ती अर्ज महाविद्यालयीन स्तरावर प्रलंबित राहण्यास, रद्द होण्यास अनेक संस्थाच जबाबदार आहेत. त्यामुळे अशा शैक्षणिक शिष्यवृत्ती योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी न करणाऱ्या महाविद्यालयावर कारवाई करण्याची आवश्यकता आहे, ती तत्परतेने व्हावी अशी मागणी कॉप्स विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष अमर एकाड यांनी केली आहे.

चौकट

वर्ष - शासनाकडून प्राप्त तरतूद (कोटी)- झालेला खर्च - लाभार्थी संख्या

२०१०-११- ६०३. ९१- ४६७. ३७- ४३२०७३

२०११-१२- ६१६. ७६- ६१४. १७- ४१६४८५

२०१२-१३- ७६२ ८०- ७६२. ४८- ४८३३८७

२०१३-१४- ८४४. ४१- ८४३. ७१- ३९६२९६

२०१४-१५- ७९० -७८७-. ९४- ३४२१०८

२०१५-१६- ८११. - ८१०- ५६९२७४

२०१६-१७- १०१७. ५३- १०१७. ५०- ४३५२९२

२०१७-१८- ८८७. ९०- ८८३.४७- २२७४८०

२०१८-१९- १५२५. - १३३२. ६२- ३०९२८२

२०१९-२०- १७१७. २०- १०५३. ३८-२६६०१३

२०२०-२१- ३७२. ०८ - ३७२. ०८- १५६४५३