मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात आपत्कालीन घटनांचे सत्र सुरूच असून, या वर्षीच्या जुलै महिन्यापर्यंत ९ हजार ९४३ आपत्कालीन दुर्घटनांत १३७ लोकांचा बळी गेला आहे, तर ५७९ जण जखमी झाले आहेत. मुंबई महापालिकेने माहितीच्या अधिकाराखाली माहिती अधिकार कार्यकर्ते शकील अहमद शेख यांना ही माहिती दिली आहे.
१ जानेवारीपासून २०१९ जुलैपर्यंत एकूण ९९४३ आपत्कालीन दुर्घटना घडल्या. यात १३७ लोकांचा मृत्यू झाला असून त्यात ९२ पुरुष आणि ४५ महिलांचा समावेश आहे. ५७९ जण जखमी झाले असून त्यात ३७२ पुरुष आणि २०७ महिलांचा समावेश आहे. ३०३२ आगीच्या घटना घडल्या. १७ जणांचा मृत्यू झाला. १२७ लोक जखमी झाले. बांधकामाचा भाग कोसळल्याच्या ६२२ घटना घडल्या. ५१ जणांचा मृत्यू झाला. २२७ जण जखमी झाले. झाडे कोसळण्याच्या ३३६४ घटना घडल्या. ५ जणांचा मृत्यू तर २१ लोक जखमी झाले. नाल्यासह खाडीत पडल्याच्या १०३ घटना घडल्या. ३९ जणांचा मृत्यू झाला असून, २७ लोक जखमी झाले आहेत.शॉक लागण्याच्या ११४ घटना घडल्या. यात ५ जणांचा मृत्यू झाला. १३ जण जखमी झाले. रस्ते खचणे/ खराब रस्त्यामुळे १६१ घटना घडल्या. ११ जणांचा मृत्यू झाला. ५३ जण जखमी झाले. पूल/पादचारी पूल पडण्याच्या ६७ घटना घडल्या. यात ६ जणांचा मृत्यू झाला. ३४ जण जखमी झाले. वायुगळतीच्या १८५ घटना घडल्या. यात दोघांचा मृत्यू झाला. १५ जण जखमी झाले. रस्त्यावर आॅईल पडण्याच्या ६१५ घटना घडल्या असून, यात एकाचा मृत्यू झाला. दरम्यान, २०१३ पासून २०१८ पर्यंत ४९ हजार १७९ आपत्कालीन दुर्घटनांत ९८७ जणांचा बळी तर ३ हजार ६६ जण जखमी झाले आहेत.पाच जण सुखरूपशुक्रवारी सकाळी पावणे सहाच्या धारावी येथील तळमजला अधिक एक असलेल्या बिसमिल्लाह चाळीच्या बांधकामाचा काही भाग कोसळल्याची घटना घडली. या बांधकामाच्या ढिगाऱ्याखाली पाचजण अडकले होते. या पाचही लोकांना सुरक्षितरित्या सुखरुप बाहेर काढण्यात आले, अशी माहिती मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली.एसी पेटलागुरुवारी रात्री सव्वा अकराच्या सुमारास कुलाबा येथील तळमजला अधिक आठ मजली मोनिका इमारतीच्या सहाव्या मजल्यावरील वातानुकुलित यंत्रास आग लागली. दुर्घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झालेल्या यंत्रणांनी आगीवर नियंत्रण मिळवित स्थानिकांना दिलासा दिला.