१३८ अनधिकृत इमारतींवर कारवाई

By admin | Published: March 24, 2017 01:21 AM2017-03-24T01:21:48+5:302017-03-24T01:21:48+5:30

‘के पश्चिम’ विभागात वर्सोवा परिसरातील जिल्हाधिकाऱ्यांच्या अखत्यारीत असणाऱ्या जमिनी आणि सीआरझेड क्षेत्रातील १३८ अतिक्रमणे

138 Action on unauthorized buildings | १३८ अनधिकृत इमारतींवर कारवाई

१३८ अनधिकृत इमारतींवर कारवाई

Next

मुंबई : ‘के पश्चिम’ विभागात वर्सोवा परिसरातील जिल्हाधिकाऱ्यांच्या अखत्यारीत असणाऱ्या जमिनी आणि सीआरझेड क्षेत्रातील १३८ अतिक्रमणे तोडण्यात आली. पोलीस व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सहकार्याने महापालिकेच्या पथकाने आतापर्यंत १३८ अतिक्रमणे तोडली आहेत, असे साहाय्यक आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी सांगितले.
वर्सोवा परिसरातील सरदार वल्लभभाई पटेल नगरजवळ असणाऱ्या सिद्धार्थ नगर परिसरात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अखत्यारीत असणाऱ्या सागरी नियमन क्षेत्रातील जमिनीवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे होती. ही अतिक्रमणे हटविण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या विनंतीनुसार महापालिकेद्वारे कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई करण्यासाठी पोलीस दलाचे ३० पोलीस कर्मचारी, महापालिकेचे २२ कामगार, कर्मचारी, अधिकारी आणि जिल्हाधिकारी कार्यालयाचे ७ कर्मचारी, अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: 138 Action on unauthorized buildings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.