शिष्यवृत्तीचे १३९२ कोटी केंद्राकडे प्रलंबित
By admin | Published: March 27, 2015 01:24 AM2015-03-27T01:24:18+5:302015-03-27T01:24:18+5:30
शिष्यवृत्तीचे १३९२ कोटी रुपये केंद्र सरकारकडे गेली १४ वर्षे प्रलंबित असल्याची माहिती सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी गुरुवारी विधान परिषदेत दिली.
मुंबई : केंद्र शासन पुरस्कृत इतर मागासवर्गीयांच्या मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्तीचे १३९२ कोटी रुपये केंद्र सरकारकडे गेली १४ वर्षे प्रलंबित असल्याची माहिती सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी गुरुवारी विधान परिषदेत दिली.
रामहरी रुपनवर, जोगेंद्र कवाडे आदी सदस्यांनी याबाबत लक्षवेधी सूचना दाखल केली होती. राज्यातील बी.सी.ए., बी.बी.ए. व बी.सी.एम. या अभ्यासक्रमात प्रवेश घेणाऱ्या ओबीसी विद्यार्थ्यांनाही ही शिष्यवृत्ती देण्याची मागणी रुपनवर यांनी केली. त्यावर राज्याचा तंत्रशिक्षण विभाग व सामाजिक न्याय विभाग केंद्र सरकारने शिष्यवृत्तीकरिता स्वीकारलेल्या अभ्यासक्रमाखेरीज अन्य कोणत्या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना लाभ देता येईल याच अभ्यास करीत
आहेत. १५ दिवसांपूर्वी तसा
प्रस्ताव वित्त विभागाकडे धाडला
असून या अभ्यासक्रमालाही शिष्यवृत्ती लागू करण्यात येईल, असे राजकुमार बडोले यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)