Join us  

मुंबई विमानतळावर १४ तस्करींचा पर्दाफाश; ४८ तासांत ३.९२ कोटींचे सोने जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2024 8:54 AM

गेल्या दोन दिवसांत मुंबई विमानतळावर सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी सोने तस्करीच्या १४ प्रकरणांचा पर्दाफाश केला आहे.

मुंबई : गेल्या दोन दिवसांत मुंबई विमानतळावर सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी सोने तस्करीच्या १४ प्रकरणांचा पर्दाफाश केला आहे. या कारवायांमध्ये ३ कोटी ९२ लाख रुपयांचे ७ किलो २० ग्रॅम सोने जप्त करण्यात आले आहे. तसेच पाच आयफोन-१५ देखील जप्त केले आहेत. १४ ते १६ फेब्रुवारी दरम्यान अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. यापैकी एका प्रकरणात तर तस्करांनी चक्क विमानाच्या सीटमध्येच सोने लपविल्याचे आढळून आले.

• अन्य एका प्रकरणात व्हॅक्यूम क्लीनरमध्ये सोने दडवून आणल्याचे अधिकाऱ्यांना आढळून आहे. या १४ प्रकरणांमध्ये अटक केलेल्या आरोपीमध्ये काही भारतीय नागरिक तर काही परदेशी नागरिकांचा समावेश असून या प्रकरणांचा तपास सुरू असल्याचे सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :सोनं